शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

पीएम नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्यात 'चादर' पाठवणार; हिंदू संघटनांचा आक्षेप, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 20:56 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 813व्या उर्सानिमित्त पीएम मोदी चादर पाठवत आहेत.

PM Modi Ajmer Sharif dargah: मागील काही दिवसांपासून देशात अजमेर शरीफ दर्गा चर्चेत आहे. काही हिंदू संघटनांनी या दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा केला आहे. अशातच, दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदीअजमेर शरीफ दर्ग्यासाठी चादर पाठवणार आहेत. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 813व्या उर्सानिमित्त केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधी म्हणून दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी जाणार आहेत. दरम्यान, पीएम मोदींनी दर्ग्यावर चादर चढवण्यावर काही हिंदू संघटनांनी आक्षेप व्यक्त केला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 जानेवारी रोजी अजमेर शरीफ दर्ग्यात चादर अर्पण करण्यात येणार आहे. दर्ग्याचे सेवक अफसान चिश्ती यांनी सांगितले की, पीएम मोदी दरवर्षी गरीब ख्वाजा नवाजच्या दर्ग्यावर चादर अर्पण करतात. 

हिंदू संघटनांचा विरोधसंभल प्रकरणानंतर अजमेर शरीफ दर्ग्यावरही जोरदार राजकारण सुरू आहे. काही हिंदू संघटनांनी अजमेर शरीफ दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा दावा करत आहेत. पंतप्रधान मोदी 11व्यांदा तिथे चढण्यासाठी चादर पाठवत आहेत. त्यामुळेच आता हिंदू संघटनांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध सुरू झाला आहे. जोपर्यंत दर्गा आणि मंदिराचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, तोपर्यंत पीएम मोदींनी अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवू नये, असा दावा त्यांनी केला आहे.

हिंदू सेनेच्या अध्यक्षांचे पंतप्रधानांना पत्रहिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी म्हटले की, चादर पाठवण्यास आपला आक्षेप नाही, मात्र घटनात्मक पदावरील व्यक्तीने चादर पाठवली, तर त्याचा थेट परिणाम केसवर होईल. त्यामुळेच विष्णू गुप्ता यांनी पत्र पाठवून परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत चादर न पाठवण्याची विनंती केली आहे. विष्णू गुप्ता पुढे म्हणतात की, जोपर्यंत अयोध्या प्रकरण कोर्टात सुरू होते, तोपर्यंत पीएम मोदी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले नव्हते. त्यामुळे आताही त्यांनी प्रकरण कोर्टात असेपर्यंत चादर पाठवू नये.

पंतप्रधान मोदींनी दबावात येऊ नयेया मुद्द्याबाबत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये. त्यांना चादर पाठवायची असेल, तर त्यांनी नक्कीच पाठवावी. अजमेर शरीफला फक्त एकाच धर्माचे लोक जात नाहीत. तिथे मुस्लिमांपेक्षा गैर-मुस्लिम जास्त जातात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीajmer-pcअजमेरHinduहिंदूMuslimमुस्लीम