शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
8
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
9
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
10
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
11
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
12
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
13
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
14
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
15
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
16
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
17
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
18
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
19
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
20
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!

एनसीसीला आता मोठी जबाबदारी देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

By जयदीप दाभोळकर | Updated: January 28, 2021 13:55 IST

प्रशिक्षणाला सुरूवात, राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केलं संबोधित

ठळक मुद्देराष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केलं संबोधितसंविधातील नागरिकांसाठीच्या कर्तव्यांचं पालन करणं आपलं दायित्व, पंतप्रधानांचं वक्तव्य

पंतप्रधाननरेंद्र मोदी हे गुरूवारी दिल्लीतील राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आलं. "संविधानात नागरिकांच्या कर्तव्यांबाबत सांगण्यात आलं आहे, त्याचं पालन करणं हे सर्वांचं दायित्व आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. तसंच विषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान भारत त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच आता एनसीसीला मोठी जबाबदारी देण्यात येणार असून प्रशिक्षणही सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि तिनही दलांचे प्रमुख उपस्थित होते. "विषाणू असो किंवा सीमेवरील आव्हा भारत पूर्ण ताकदीनीशी तयार आहे हे गेल्या वर्षानं सर्वांना दाखवून दिलं आहे. आज देशात दोन स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक लसी तयार करण्यात आल्या आहेत. लष्कराचं आधुनिकीकरण करण्यात येत आहे. देशाला राफेल विमानंदेखील मिळाली आहेत. लष्कराच्या गरजा आता भारतातच पूर्ण करण्यात येत आहेत," असंही मोदी यावेळी म्हणाले.  "या ठिकाणी येऊन मला कायमच सुखद अनुभव येतो. प्रत्येकाला अभिमान वाटतो. ज्या देशांमध्ये शिस्त आहे त्या देशांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव उंचावलं आहे. सर्व तरूणांनी आपल्या आसपासच्या लोकांनाही शिस्त शिकवली पाहिजे," असा सल्लाही मोदींनी यावेळी दिला. "देशात जेव्हा कोणतंही महत्त्वाचं काम असतं त्यावेळी एनसीसीचे कॅडेट्स त्या ठिकाणी हजर असतात. संकटकाळातही मदतीसाठी ते पुढे असतात. संविधानात नागरिकांच्या कर्तव्याबबात सांगण्यात आलं आहे. परंतु त्याचं पालन करणं हे प्रत्येकाचं दायित्व आहे. देशात नक्षलवादाची मोठी समस्या होती. परंतु लोकांमध्ये झालेल्या जनजागृतीमुळे नक्षलवादाचं कंबरडं आता मोडलं आहे," असंही त्यांनी नमूद केलं.एनसीसीला मोठी जबाबदारी"एनसीसीच्या कार्यक्षेत्राचा आता विस्तार करण्यात येणार आहे. सीमावर्ती भाग, सुमद्र किनाऱ्यांशी निगडीत सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी एनसीसीला सामावून घेतलं जाणार आहे. यासाठी एक लाख कॅडेट्सना प्रशिक्षण दिलं जात आहे. आता मोठ्या प्रमाणात मुलीही कॅडेट्सचा भाग बनू लागल्या आहेत," असंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानdelhiदिल्लीRajnath Singhराजनाथ सिंहBipin Rawatबिपीन रावत