शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

15 ऑगस्टपासून भ्रष्ट अधिका-यांविरोधात पंतप्रधान मोदींचा सर्जिकल स्ट्राईक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 10:07 IST

भ्रष्टाचाराविरोधात पुकारलेल्या लढाईमध्ये आता केंद्रातील मोदी सरकारच्या रडावर भ्रष्ट सरकारी अधिकारी-कर्मचारी आहेत. मोदी सरकारचं आता मोठं सर्जिकल स्ट्राईक भ्रष्ट सरकारी कर्मचा-यांविरोधात सुरू होणार आहे.

नवी दिल्ली, दि. 1 - भ्रष्टाचाराविरोधात पुकारलेल्या लढाईमध्ये आता केंद्रातील मोदी सरकारच्या रडावर भ्रष्ट सरकारी अधिकारी-कर्मचारी आहेत. मोदी सरकारचं आता मोठं सर्जिकल स्ट्राईक भ्रष्ट सरकारी कर्मचा-यांविरोधात सुरू होणार आहे. सरकारनं यासाठी मोठी योजनादेखील आखली आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्व डागाळलेले अधिकारी व कर्मचा-यांच्या नावांची यादी बनवण्याची तयारी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. सर्व मंत्रालयं आणि विभागांतून डागाळलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या नावांची यादी सरकारनं मागवली आहे. यानुसार कर्मचा-यांची नावं, त्यांच्याविरोधातील आरोप, तपासाची स्थिती आणि त्यासंदर्भातील अहवाल दिले जाणार आहेत. 

यानुसार, केंद्र सरकारमधील सर्व भ्रष्ट कर्मचा-यांसंबंधी पुरावे देणारे कागदपत्रं तयार करुन याद्वारे भ्रष्ट कर्मचा-यांची सर्व माहिती उपलब्ध राहावी, असा या योजनेमागील हेतू आहे. गृहमंत्रालयाकडून 23 जुलैला सर्व मंत्रालयं व विभागांना पाठवण्यात आलेल्या पत्रात 5 ऑगस्टपर्यंत ही कागदपत्रं तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  अंतिम मुदतीचं पालन करणे आवश्यक आहे, असा सक्तीचा आदेशही या पत्रामध्ये देण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार  भ्रष्ट कर्मचा-यांच्या माहितीचे कागदपत्रं बनवले जात आहेत. यामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर संबंधितांविरोधात कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली, याचा उल्लेख करावा लागणार आहे. या प्रक्रियेत भ्रष्ट कर्मचा-यांना वाचवणा-यांचीही नावं समोर येणार आहेत.  दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार दूर करण्याच्या मोहीमेसंदर्भात बातचित करण्याची शक्यता आहे. 

भ्रष्ट कर्मचा-यांनी माहिती उपलब्ध झाल्यानंतर ही माहिती सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालयाला पाठवण्यात येणार आहे. त्या आधारे संबंधित यंत्रणा स्वतंत्रपणे कारवाई करू शकतात. त्यामुळे एकाचवेळी हजारो कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  अलिकडेच मोदी सरकारनं खराब कामगिरी करणाऱ्या अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. यानंतर आगामी काही दिवसांत  पुन्हा एकदा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 110 आयएएस आणि आयपीएस अधिकारी रडारवर आहेत.