शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

Mann ki Baat: जलसंकटावर मात करण्यासाठी जनशक्तीनं एकजूट व्हावं; मोदींचं आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:03 PM

दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मन की बातमधून मोदींचं आवाहन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या टप्प्यात जल संरक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. सध्या देशाचा बहुतांश भाग जल संकटाचा सामना करत असल्यानं सर्वांनी जल संरक्षण करण्याची गरज असल्याचं आवाहन मोदींनी केलं. लोकांचा सहभाग आणि सहाय्य यांच्या मदतीनं जल संकटावर मात करू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पाणी टंचाईच्या समस्येनं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. यावर मोदींनी 'मन की बात'मधून भाष्य केलं. पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीनं घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. 22 जूनला देशातील हजारो ग्रामपंचायतींनी जल संरक्षणाचा संकल्प केल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी झारखंडच्या हजारी बागमधील एका सरपंचाचा संदेशदेखील ऐकवला. पंतप्रधानांनी मला पाण्याच्या संरक्षणासाठी पत्र लिहिलं, यावर माझा अद्यापही विश्वास बसत नसल्याचं या संदेशात संबंधित सरपंचानं म्हटलं होतं.पाण्याचं संरक्षण करण्याचा संकल्प केलेल्या सर्व सरपंचांना मोदींनी मन की बातमधून शुभेच्छा दिल्या. 'स्वच्छता आंदोलनाप्रमाणेच आता लोक गावागावात जलमंदिर तयार करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. जल संरक्षणाच्या प्रयोगांचा अभ्यास करुन त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांच्या कामाचं कौतुक होणं गरजेचं असून त्याबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण व्हायला हवी,' असं मोदी म्हणाले. सोशल मीडियावर जनशक्ती फॉर जलशक्ती हा हॅशटॅग सुरू करावा, असं आवाहन त्यांनी केलं.