नवी दिल्ली: अमेरिकेचे मावळते पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर खातं बंद करण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेबाहेर घातलेल्या गोंधळामुळे ट्विटरनं ही कारवाई केली. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये वापरलेली भाषा चिथावणीखोर असल्यानं ट्विटरनं ट्रम्प यांचं खातं बंद केलं. ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. ट्रम्प यांचं खातं बंद करण्यात आल्यानं आता पंतप्रधान मोदी ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते झाले आहेत. ट्विटवर सर्वाधिक फॉलोअर्स असण्याचा मान थोड्या दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे होता. मात्र ट्रम्प यांचं ट्विटर खातं बंद करण्यात आल्यानं आता हा मान मोदींना मिळाला आहे. समर्थकांना हिंसाचारासाठी चिथावणी दिल्यानं ट्विटरनं ट्रम्प यांना जोरदार दणका दिला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी ट्विटर खात्याला ८८.७ मिलियन म्हणजेच ८ कोटी ८७ लाख लोक फॉलो करतात. सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीत थोड्याच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ६४.७ मिलियन म्हणजेच ६ कोटी ४७ लाख इतकी आहे. मात्र आता ट्रम्प यांचं खातंच बंद करण्यात आल्यानं मोदी ट्विटवर सर्वाधिक फॉलो असलेले नेते झाले आहेत.अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी धुमाकूळ घातला. ट्रम्प यांनी चिथावणी दिल्यानंच हा प्रकार घडल्याचा आरोप झाला. त्यामुळे ट्विटरनं ट्रम्प यांचं ट्विट काढून टाकत त्यांना ब्लॉक केलं. त्यानंतर त्यांचं खातं कायमस्वरुपी बंद करण्याची कारवाई केली. डोनाल्ड ट्रम्प त्यांचं खातं चिथावणी देण्यासाठी वापरू शकतात. त्यामुळे त्यांचं खातं बंद करत असल्याची माहिती ट्विटरनं दिली.
दणका ट्रम्पना अन् फायदा मोदींना; पंतप्रधानांच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद
By कुणाल गवाणकर | Updated: January 10, 2021 16:01 IST