शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदी अन् राहुल गांधी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणार, लवकरच बैठक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:45 IST

देशाचे विद्यमान निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2025 ला संपत आहे.

Chief Election Commissioner: देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार येत्या 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे लवकरच नवीन व्यक्तीची या पदावर निवड होणार आहे. यासाठी कायदे मंत्रालयाने 17 फेब्रुवारी 2025 रोजी तीन सदस्यीय समितीची बैठक बोलावली आहे. निवड समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. 

राजीव कुमारांची 2022 मध्ये नियुक्ती राजीव कुमार यांची मे 2022 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने 2024 मध्ये लोकसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. याशिवाय एका दशकाहून अधिक काळानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त(नियुक्ती, अटी आणि कार्यकाळ) कायदा, 2023 च्या तरतुदी CEC च्या नियुक्तीसाठी प्रथमच लागू केल्या जात आहेत. 

लोकसभा निवडणुकीनंतर  महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या. 2023 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या होत्या. जानेवारी 2025 मध्ये दिल्ली निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना राजीव कुमार यांनी त्यांच्या निवृत्ती योजनेबद्दल सांगितले होते. गेल्या 13-14 वर्षांपासून कामामुळे वेळ मिळत नसल्याचे त्यांनी विनोदी स्वरात सांगितले. तसेच, निवृत्तीनंतर चार-पाच महिने हिमालयात जाऊन एकांतात ध्यान करणार असल्याचेही ते म्हणाले होते.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी