शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

PM Cares for Children: पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत 2000 ऐवजी आता मोदी सरकार देणार 4 हजार रुपये?  जाणून घ्या, सविस्तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 13:17 IST

PM Cares for Children: केंद्रीय मंत्रिमंडळ पुढील काही आठवड्यांत यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लाखो कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अनेक मुलांनी त्यांचे पालक गमावले आहेत. अशा मुलांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 'पीएम केअर्स फॉर  चिल्ड्रन स्कीम' सुरू केली आहे. याअंतर्गत मुलांना 2,000 रुपयांचे मानधन मिळते. मात्र आता सरकार ही रक्कम 4000 रुपयांपर्यंत वाढवणार असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ पुढील काही आठवड्यांत यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. (pm cares for children scheme under the pm cares for children scheme instead of 2000 the government will now give 4 thousand rupees)

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजना29 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फॉर  चिल्ड्रन योजनेअंतर्गत अशा मुलांना शिक्षण आणि वैद्यकीय विम्याची सुविधा जाहीर केली होती. आता या योजनेअंतर्गत मदतीची रक्कम वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. या योजनेशी संबंधीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने अशा अनाथ मुलांना वेतन वाढवून 4,000 रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासह, ते म्हणाले की, येत्या काही आठवड्यांत त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते.

3250 अर्ज प्राप्त महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारला पीएम केअर्स फॉर  चिल्ड्रन योजनेसाठी आतापर्यंत 467 जिल्ह्यांमधून  3250 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी विविध राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 667 अर्ज मंजूर केले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सध्या सुरू आहे. म्हणजेच आता सरकारकडे अर्ज येऊ लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केली होती घोषणा?1. कोरोनामुळे आई -वडील गमावलेल्या मुलांना 18 वर्षे वयापर्यंत सरकार मासिक भत्ता (स्टायपेंड) देईल.2. या अंतर्गत, मुले 23 वर्षांची झाल्यावर पीएम केअर्स फंडातून 10 लाख रुपयांची एकमुश्त रक्कम दिली जाईल.3. केंद्र सरकारकडून या मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल.4. या अंतर्गत, मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळेल, ज्याचे व्याज पीएम केअर्स फंडातून दिले जाईल.5. या मुलांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 18 वर्षांपर्यंत 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळेल.6. विमा प्रीमियम पीएम केअर्स फंडातून भरला जाईल.7. दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना जवळच्या मध्यवर्ती शाळा किंवा खाजगी शाळेत प्रवेश दिला जाईल.8. 11 ते 18 वयोगटातील मुलांना सैनिक शाळा आणि नवोदय विद्यालय यासारख्या केंद्र सरकारच्या कोणत्याही निवासी शाळेत प्रवेश दिला जाईल.9. जर मुले त्याच्या पालक किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यासह राहत असेल तर त्याला जवळच्या केंद्रीय विद्यालय किंवा खाजगी शाळेत प्रवेश मिळेल.10. जर मुलाला खाजगी शाळेत दाखल केले असेल तर शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत त्याची फी पीएम केअर फंडातून दिली जाईल आणि त्याच्या शाळेचा गणवेश, पुस्तके आणि प्रतीचा खर्चही दिला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस