नवी दिल्ली : स्वत:ची ‘मन की बात’ ‘आकाशवाणी’च्या माध्यमातून उघड करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांनीही त्यांची ‘मन की बात’ आपल्यापर्यंत जरूर पोहोचवावी, असे आवाहन रविवारी केले. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी तुमच्या मनातील कल्पना सुचवाव्यात असे आवाहन मोदी यांनी केले. दरम्यान, सरकारी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांची दर महिन्याच्या ९ तारखेला तपासणी होईल. सरकारी हॉस्पिटलमध्ये काम न करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी एक दिवस बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तुमची ‘मन की बात’ मला कळवा
By admin | Updated: August 1, 2016 05:04 IST