शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफ करा - चव्हाण

By admin | Updated: May 6, 2016 02:21 IST

दुष्काळाच्या वणव्याने होरपळत असलेल्या महाराष्ट्रासह दहा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी

नवी दिल्ली : दुष्काळाच्या वणव्याने होरपळत असलेल्या महाराष्ट्रासह दहा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी करीत विरोधकांनी लोकसभेत दुष्काळग्रस्तांच्या व्यथेला वाचा फोडली.दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे उद्भवलेली गंभीर स्थिती, या ज्वलंत मुद्यांवरील लोकसभेतील चर्चेत सहभागी होत खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने वेळीच पावले उचलली असती तर, आज ही स्थिती उद्भवली नसती. नजीकच्या दिवसांत आणि महिन्यात पावसाने मेहरबानी केली नाही तर, १९७२ सारखी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. या संकटातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जाची फेररचना करुन काहीही साध्य होणार नाही. सलग तीन वर्षापासून दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत आहे. तेव्हा केंद्राने तात्काळ शेतकऱ्यांचे कर्ज माफी करण्याची गरज आहे. त्यासोबतच मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा किंवा कमी दरात बियाणे आणि खते पुरवावीत.खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे २० हजार कोटींचे नुकसान झाले. त्याची पुरेशी भरपाई केली पाहिजे. दुष्काळावर केंद्राने श्वेतपत्रिका आणि सर्वंकष निवेदन जारी करावे, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रात ३ हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, याकडेही अशोक चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या चर्चेप्रसंगी गृह आणि वित्त मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहणे जरुरी होते. केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ केले पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम पाच लाख करण्यात यावी. तसेच त्यांना पेन्शनही दिले पाहिजे अशी मागणी करत उसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा दावाही चव्हाण यांनी फेटाळून लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दुष्काळ व पाणी टंचाईमुळे निर्माण झालेल्या स्थितीवरील चर्चेसाठी निमंत्रित केले. मुख्यमंत्री फडणवीस, अखिलेश यादव व सिद्धरामैय्या यांना पंतप्रधानांनी स्वतंत्रपणे चर्चेसाठी बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले.