शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

खेळण्यातल्या बंदुकीने आजी-आजोबाला लुटण्याचा प्रयत्न, नातवाला अटक

By admin | Updated: June 12, 2017 14:17 IST

देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खेळण्यातील बंदूक दाखवून स्वतःच्याच वृद्ध आजी- आजोबांना लुटण्याचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. 12 - देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खेळण्यातील बंदूक दाखवून स्वतःच्याच वृद्ध आजी- आजोबांना लुटण्याचा प्रयत्न करणा-या नातवाला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहीणी सेक्टर 7 येथे ही धक्कादायक घटना घडली. येथे राहणारे रामलाल मिगलान (वय-90) यांचा नातू रजत(वय-21) याने त्याचा सहकारी ऋषभ (वय- 23) याला शनिवारी संध्याकाळी आपल्या घरी पाठवलं. गॅस सिलेंडरची तपासणी करण्याच्या बहाण्याने ऋषभ घरात शिरला. ऋषभला घेवून रामलाल स्वयंपाक घरात गेले असता रजतने हेल्मेट घालून घरात प्रवेश केला. त्याने आपल्या शकुंतला देवी या 84 वर्षाच्या आजीला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी आजीने आरडा-ओरड केली. पत्नीचा आवाज ऐकून शंका आल्यामुळे  रामलाल यांनी स्वयंपाक घरातच ऋषभला पकडून ठेवलं आणि मदतीसाठी आरडा-ओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी आले आणि त्यांनी दोन्ही तरूणांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
 
पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. घराची विक्री करून आजी-आजोबांना मोठी रक्कम मिळाली होती त्यामुळे त्यांमना लुटण्याची योजना आखल्याचं त्यांनी सांगितलं. वृद्ध आजी-आजोबांना लुटण्यासाठी खेळण्यातील बंदूक आरोपिंनी विकत घेतली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी ही बंदूक जप्त केली आहे.