३ गावांत ३००० वृक्षांची लागवड
By admin | Updated: December 21, 2015 00:02 IST
आसखेड : खेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस यांच्या वतीने शरदराव पवार अमृत महोत्सवानिमित्ताने बहूळ, शेलू, आसखेड या गावात ३००० वृक्षांची लागवड करण्यात आली. अशी माहिती राष्ट्रवादीचे युवक नेते कैलास लिंभोरे यांनी दिली.यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्या सुरेखा मोहिते पाटील म्हणाल्या सर्वसामान्यांची व शेतकर्यांची जाण असलेले ...
३ गावांत ३००० वृक्षांची लागवड
आसखेड : खेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस यांच्या वतीने शरदराव पवार अमृत महोत्सवानिमित्ताने बहूळ, शेलू, आसखेड या गावात ३००० वृक्षांची लागवड करण्यात आली. अशी माहिती राष्ट्रवादीचे युवक नेते कैलास लिंभोरे यांनी दिली.यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्या सुरेखा मोहिते पाटील म्हणाल्या सर्वसामान्यांची व शेतकर्यांची जाण असलेले नेते म्हणजे फक्त शरद पवार हेच आहेत.खेड तालुक्यातील जनतेच्या वतीने आरोग्यदायी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कैलास सांडभोर, डॉ. शैलेश मोहीते पाटील यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पिम विभागाचे राष्ट्रवादीचे युवक नेते कैलास लिंभोरे यांनी केले होते.अमृत महोत्सवानिमित्ताने चिंच वड, पिंपळ, लिंब ,बांबू, यासारख्या ३००० वृक्षांची लागवड शेलू, बहूळ, आसखेड भागातील शाळा, मंदीरे, गायरान व ग्रामपंचायतीच्या जागात करण्यात आली. बाजार समितीचे सभापती विलास कातोरे, पं.स.चे सभापती सुरेश शिंदे, माजी कृषी सभापती अरूण चांभारे, डॉ. शैलेश मेहिते, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, अशोक शेंडे, पिम विभाग अध्यक्ष कांतराम पानमंद, पं.स.माजी सदस्य तानाजी केंदळे, माजी पिम वि. युवाध्यक्ष अमोल पानमंद, उद्योजक विलास काळे व दत्ताञय सिताराम पडवळ, नथूराम लिंभोर पाटील, कैलास लिंभोरे, सरपंच दत्ताञय करंडे, गुलाब शिवेकर, सचीन देवकर, चिंधू करंडे, गणपत घावटे, नारायण गाडे, दत्ताञय कि. पडवळ, गोरक्ष घावटे, ग्रामस्थ उपस्थीत होते.फोटो...जेष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने खेड राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने वृक्षारोपण करताना तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर व सभापती सुरेश शिंदे व राष्ट्रवादी कार्यकर्ते.================