शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमाने घ्याल, तरच कारखाना भारतामध्ये!

By admin | Updated: August 7, 2016 01:47 IST

जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आमच्या एफ-१६ ब्लॉक ७० या विमानांचीच भारतीय हवाई दलासाठी खरेदी करण्याची हमी भारताने दिली तरच, कारखाना इथे हलविण्याची

नवी दिल्ली : जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आमच्या एफ-१६ ब्लॉक ७० या विमानांचीच भारतीय हवाई दलासाठी खरेदी करण्याची हमी भारताने दिली तरच, कारखाना इथे हलविण्याची आमची तयारी आहे, असा प्रस्ताव लॉकहीड मार्टिन या संरक्षणसामुग्रीचे उत्पादन करणाऱ्या बलाढ्य अमेरिकी कंपनीने दिला आहे.‘मेक इन इंडिया’चा फायदा घेऊन जगातील कंपन्यांनी भारतात यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यास अनुसरून लॉकहीड मार्टिन कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे. कंपनीच्या एफ-१६ व्यवसाय विभागाचे प्रमुख रॅण्डल एल. हॉवर्ड म्हणाले की, एफ-१६ ब्लॉक ७० लढाऊ विमाने भारतासाठी, तिथेच तयार करून त्यांची तेथूनच जगभरात निर्यात करण्याची कंपनीची तयारी आहे. ती भारतने घेण्याच्या अटीवरच कंपनी अमेरिकेतील कारखाना इथे हलविणार का, असे विचारता कंपनीचे भारतातील प्रभारी अभय परांजपे यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. भारताने विमाने खरेदी करायलाच हवीत, अशी अट घालताना तुम्ही एफ-१६ विमाने पाकिस्तानला न देण्याची हमी द्यायला तयार आहे का, या प्रश्नाला सरळ उत्तर देण्याचे टाळत ते म्हणाले, आमची विमाने भारतीय हवाई दलासाठी सर्वोत्तम आहेत. त्यामुळे दिलेला शब्द पाळेल, असा भागीदार भारताने निवडणे महत्त्वाचे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)लॉकहीड मार्टिनचा प्रस्ताव लॉकहीड मार्टिन कंपनीने आत्तापर्यंत एफ-१६ जातीची ४,५८८ विमाने जगभर विकली आहेत. कंपनीकडे सध्या असलेल्या आॅर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांचा अमेरिकेतील कारखाना आणखी वर्षभर सुरु राहू शकेल. इतर देशांकडून मागणी आली तर कारखाना त्यापुढे पाच वर्षे सुरु राहू शकेल.भारतात कारखाना सुरु केल्यास भारताची गरज भागविण्याखेरीज इतरांसाठी आणखी १०० विमाने येथे उत्पादित करण्याची कंपनीची योजना आहे. -अमेरिकेच्या हवाई दलात एफ-१६ विमाने पुढील किमान एक दशक तरी वापरात राहणार आहेत.