शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगांमधील कैदयांची गर्दी घटविण्याची योजना राबवा

By admin | Updated: October 4, 2016 03:42 IST

देशातील बहुसंख्य राज्यांच्या तुरुंगांमध्ये क्षमतेहून कितीतरी अधिक कैदी कोंबल्यामुळे निर्माण झालेल्या

नवी दिल्ली: देशातील बहुसंख्य राज्यांच्या तुरुंगांमध्ये क्षमतेहून कितीतरी अधिक कैदी कोंबल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून, सर्व राज्यांनी तुरुंगांमधील ही वारेमाप गर्दी कमी करण्याची कृती योजना येत्या ३१ मार्चपूर्वी तयार करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.या आधी असाच आदेश ६ मे रोजी देऊनही एकाही राज्य सरकारने त्या अनुषंगाने काहीही पावले उचललेली नाहीत, यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. आर. के. अगरवाल यांच्या खंडपीठाने हा आदेश पुन्हा दिला.या आधी मेमध्ये झालेल्या सुनावणीत देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १४९ तुरुंगांमध्ये क्षमतेहून दीडपट जास्त कैदी कोंबलेले आहेत, अशी माहिती राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे अ‍ॅमायकस क्युरीने न्यायालयास दिली होती. त्यात महाराष्ट्रातील १६ कारागृहांचा समावेश होता. तुरुंगांमधील प्रमाणाबाहेर गर्दीच्या प्रश्नाकडे एककल्ली पद्धतीने पाहून चालणार नाही. हा विषय गंभीर असून, त्यामुळे सुरक्षेखेरीज आरोग्य, स्वच्छता व तुरुंग व्यवस्थापनाच्याही समस्या निर्माण होऊ शकतात, याकडे लक्ष वेधूनही राज्यांनी गेल्या सहा महिन्यांत काहीही न केल्याने, परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिक शोचनीय बनली आहे, याबद्दल खंडपीठाने खेद व्यक्त केला.