शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भारतात हल्ल्याचे पाकमध्ये नियोजन

By admin | Updated: May 13, 2017 00:04 IST

पाकिस्तानात तळ असलेले दहशतवादी गट भारत आणि अफगाणिस्तानात हल्ले करण्याचे नियोजन करीत आहेत, असे अमेरिकेच्या

वॉशिंग्टन : पाकिस्तानात तळ असलेले दहशतवादी गट भारत आणि अफगाणिस्तानात हल्ले करण्याचे नियोजन करीत आहेत, असे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक डॅनियल कोटस् यांनी म्हटले. पाकिस्तानला अतिरेकी आणि दहशतवाद्यांना आवरण्यात अपयश आल्याचेही त्यांनी सिनेटच्या गुप्तचर निवड समितीला सांगितले. जगाला असलेल्या धोक्यांवर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सुनावणीत ते बोलत होते. हे दहशतवादी व अतिरेकी गट त्या भागातील अमेरिकेच्या हितसंबंधांना सततचा धोका निर्माण करतील, त्यांचे भारत आणि अफगाणिस्तानात हल्ले घडविण्याचे सतत नियोजन आहे, असे कोटस् म्हणाले.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खालावत चाललेल्या संबंधांचा दोष अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी पाकिस्तानला दिला आणि यावर्षी पाकिस्तानकडून भारतात फार मोठा दहशतवादी हल्ला झाला तर हे संबंध आणखी वाईट होतील, असा इशाराही दिला. भारताच्या विरोधातील अतिरेक्यांना असलेला पाठिंबा रोखण्यात पाकिस्तान अपयशी ठरले आहे आणि पाकिस्तानच्या या धोरणाबद्दल भारताचा वाढत चाललेला राग, तसेच जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत होत नसलेल्या प्रगतीमुळे २०१६ मध्ये उभय देशांतील संबंध कमालीचे चिघळले, असे डॅनियल कोटस् म्हणाले. २०१६ मध्ये भारतात सीमेपलीकडून झालेल्या दोन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनंतर त्या दोन देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक चिघळल्याचे कोटस् यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)जेयूडीवर अमेरिकेचे निर्बंध-मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याच्या जमात उद दावा, लष्कर ए तय्यबा आदी दहशतवादी गटांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. या गटाचे पैसा गोळा करण्याचे जाळे आणि नेतृत्वाला उधळून लावण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे निर्बंध आहेत. लष्कर ए तय्यबाचा धर्मादाय कार्यक्रमांचा चेहरा असलेल्या तालिबान, जमात उल दावा अल कुराण, इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया आणि इसिस खोरासन यांच्यावर हे निर्बंध लादण्यात आले आहेत.