शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन आयोग झाला 'नीती आयोग'

By admin | Updated: January 1, 2015 17:26 IST

नियोजन आयोगाचे नीती आयोग असे नामकरण करण्यात आले असून सगळ्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकारिणीत समावेश असणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली,दि. १ - देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका निभावणा-या नियोजन आयोगाचे आता नीती आयोग असे नामकरण करण्यात आले आहे. नीती आयोगाच्या कार्यकारिणीमध्ये सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांचा समावेश असेल असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे सगळ्या राज्यांच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा मोदी सरकारने व्यक्त केली आहे.
जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना नियोजन आयोगाची स्थापना १९५० च्या सुमारास झाली होती. परंतु आता कालबाह्य अशी टीका त्यावर होत होती आणि मोदी सरकारने नियोजन आयोगच गुंडाळण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी नियोजन आयोग गुंडाळून त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करण्याची घोषणा केली होती. तीन आठवड्यांपर्वी यासंदर्भात मोदींनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली होती. यात काँग्रेस वगळता बहुसंख्य मुख्यमंत्र्यांनी नियोजन आयोगाऐवजी नवीन संस्था निर्माण करण्यास अनुकूलता दर्शवली होती.  केंद्र आणि राज्यातील सहकार्य वाढवून टीम इंडिया म्हणून काम करण्यासाठी नवीन संस्था उपयुक्त ठरेल असे मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. नियोजन आयोग बरखास्त करण्याच्या दिशेने मोदी सरकारने नवीन वर्षात पहिले पाऊल टाकले. गुरुवारी नियोजन आयोगाचे नामकरण नीती आयोग असे करण्यात आले आहे.