शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची रणनीती ‘पीके’ ठरविणार?

By admin | Updated: January 20, 2016 03:24 IST

लोकसभा निवडणुकीत मोदींचे मास्टर राजकीय स्ट्रॅटेजिस्ट, बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार, लालूप्रसाद, काँग्रेस महाआघाडीच्या विजयाचे शिल्पकार

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीलोकसभा निवडणुकीत मोदींचे मास्टर राजकीय स्ट्रॅटेजिस्ट, बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार, लालूप्रसाद, काँग्रेस महाआघाडीच्या विजयाचे शिल्पकार, प्रशांत किशोर उर्फ पीके पुढल्या वर्षीच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचे सारथ्य करणार आहेत. पंजाबमधे सत्ताधारी अकाली दल भाजप युती खेरीज ‘आप’चे अस्तित्वही लक्षणीय असल्याने काँग्रेसची रणनीती ठरवतांना पीकेंचा सामना यंदा एके (अरविंद केजरीवाल) यांच्याशीही होणार आहे.अकाली दल भाजप युतीकडून मात खाल्ल्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेस गेल्या ९ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. राज्याची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस यंदा कोणतीही चूक करू इच्छित नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची प्रशांत किशोर यांच्याशी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भेट झाली. त्यानंतर लगेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या आगामी रणनीतीची सूत्रे ठरवण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचे ठरवले. सध्या प्रशांत किशोर यांनी आपली टीम पंजाबच्या राजकीय स्थितीचे प्राथमिक अवलोकन करण्यासाठी रवाना केली आहे.पंजाबमधे तरूण मतदारांची संख्या जवळपास ५0 टक्के आहे. त्यासाठी सोशल मीडियावर काँग्रेसचा प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न अमरिंदर सिंग यांनी अगोदरच सुरू केले आहेत. जोडीला विविध शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांमधे तरूण वर्गाशी थेट संवाद साधण्याचा अमरिंदर सिंग यांचा जुना उपक्रमही सुरू आहेच. अरूण जेटलींचा पराभव करतांना याच प्रयोगाचा अवलंब अमरिंदर सिंग यांनी केला होता.समविचारी पक्षांची साथ मिळवण्यासाठीही काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे व राज्याचे माजी अर्थमंत्री मनप्रित बादल यांनी आपला पंजाब पीपल्स पार्टी हा पक्ष काँग्रेसमधे नुकताच विलिन केला.पंजाबमधे केजरीवाल व अकाली दलाशी झुंज देउन काँग्रेसला विजयी करण्यात पीके यशस्वी ठरले तर राजकीय स्ट्रॅटेजीच्या क्षेत्रात त्यांची उंची अधिकच वाढणार आहे, याची त्यांना जाणीव असल्याचे या सूत्रांनी सांगितले.