शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीला विक्रमाची फोडणी! कढई भरली ८00 किलोने; गिनीज बुकमध्ये झाली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:29 IST

भल्यामोठ्या कढईतील आठशे किलो खिचडीवर तडतडणा-या साजूक तुपात जिरे-मोहरी-हिंगाची फोडणी देत योग गुरू बाबा रामदेव व देशभरातील ५0 नामवंत शेफनी शनिवारी इंडिया गेटवर जागतिक विक्रम रचला.

नवी दिल्ली : भल्यामोठ्या कढईतील आठशे किलो खिचडीवर तडतडणा-या साजूक तुपात जिरे-मोहरी-हिंगाची फोडणी देत योग गुरू बाबा रामदेव व देशभरातील ५0 नामवंत शेफनी शनिवारी इंडिया गेटवर जागतिक विक्रम रचला. हजारो लोकांचा जल्लोष व फोडणीचा ठसका आणि खमंग मसाल्याचा वास यामुळे राजधानीतील इंडिया गेटचा परिसर भरून गेला होता.राजपथाची झाली खाऊगल्लीपन्नास शेफनी जागतिक खाद्यान्न महोत्सवात ही खिचडी शिजवली. शिखांच्या गुरू पर्वाचे निमित्त साधून ही खिचडी गुरूद्वारा व स्वयंसेवी संस्थांमध्ये वाटली. या वेळी अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसीमरत कौर बादल व राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती उपस्थित होत्या.राजकारणाचे केंद्र असलेला राजपथ या खिचडीमुळे आजजणू काही खाऊगल्ली झाला होता. इंडिया गेट सर्कलवर चहुबाजूंनी लोक या खाद्यान्न महोत्सवात सहभागी होत होते. सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी गर्दी जमली होती.विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. अन्नप्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारताने पुढाकार घेत महोत्सवाचे यजमानपद घेतले आहे.

टॅग्स :foodअन्न