नवी दिल्ली : एअर इंडियाचे विमान जयपूरहून दिल्लीला उड्डाण करण्याच्या तयारीत असताना कॉकपिटमध्ये वैमानिक व सहायक यांच्यात आधी शाब्दिक चकमक व नंतर तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. यानंतर दोन्ही वैमानिकांना विमान उडविण्याच्या कामापासून तात्पुरते हटविण्यात आले आहे. तथापि, या वैमानिकांत शाब्दिक चकमक उडाली व हाणामारी वगैरे झाली नाही, असा खुलासा एअर इंडियाच्या प्रवक्त्याने केला. जयपूर येथे एअर इंडियाचे एआय ६११ हे विमान दिल्लीला उड्डाण करण्याच्या तयारीत असताना आपल्या सहायक वैमानिकाने आपल्याशी गैरवर्तन आणि मारहाण केली, अशी तक्रार या विमानाच्या कमांडरने केली.
वैमानिकांनी केली विमानातच हाणामारी
By admin | Updated: April 7, 2015 03:54 IST