शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये दिसणार फोटो आणि व्हिडीओ

By admin | Updated: February 21, 2017 13:17 IST

व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट करताना त्यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि GIF टाकणं शक्य होणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - सोशल मीडिया युजर्समध्ये लोकप्रिय असलेलं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने गतवर्षी अनेक नवे फिचर्स आणले आहेत. यावर्षीदेखील व्हॉट्सअॅपने एक नवीन बदल केला असून यामुळे काय स्टेटस टाकू ? असा प्रश्न पडणा-या युजर्सना या नव्या फिचरचा फायदा होणार आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस फिचरमध्ये बदल करत असून यामुळे युजर्सना स्टेटसमध्ये फक्त टेक्स्ट न टाकता फोटो, व्हिडीओ आणि GIF टाकणं शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅप आपल्या आठव्या वाढदिवशी हे फिचर सुरु करणार आहे. 
 
 
सध्या व्हॉट्सअॅपमध्ये 'Hey there, I'm using WhatsApp' हा डिफॉल्ट स्टेटस उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपवर एकतर तुम्ही उपलब्ध असलेल्यांपैकी एखादा स्टेटस ठेवू शकता, किंवा तुमच्या भावना लिहून त्या टेक्स्ट स्वरुपात ठेवू शकता. जास्तीत जास्त त्यात स्माईली वापरुन स्टेटस आकर्षक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण आता या कंटाळवाण्या आणि रटाळ स्टेटसपासून सुटका मिळेले. खासकरुन ज्यांना वारंवार आपला स्टेटस बदलायचा असतो त्यांच्यासाठी तर हे खूपच मनोरंजक असणार आहे. 
 
या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅप स्टेसमध्ये टेक्स्टच्या ऐवजी एक छोटा व्हिडीओ टाकणं शक्य होणार आहे. सध्या ही सोय किंवा फिचर इंस्टाग्रामवर (Instagram Stories) उपलब्ध असून स्नॅपचॅटशी मिळतं जुळतं आहे. आता व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडीओ, GIF शेअर करणं शक्य होणार असून सर्वजण ते पाहू शकतात. विशेष म्हणजे आपल्या स्टेटसवर मित्र कमेंट करु शकतात, जे फक्त आपल्यालाच दिसणार. मित्रांची कमेंट चॅटच्या माध्यमातून आपल्याल येईल, त्यावेळी त्याने कोणत्या स्टेटसवर कमेंट केली आहे हेदेखील पाहायला मिळेल. हे व्हॉट्सअॅप स्टेटस 24 तासानंतर आपोआप गायब होईल. 
 
स्टेटस अपडेट करण्यासाठी मेन्यूत जाण्याची गरज राहणार नसून चॅट्स आणि कॉल्समध्ये त्यासाठी वेगळा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे. डिफॉल्ट सेटिंगनुसार आपले सर्व मित्र स्टेटस पाहू शकतात. पण जर काही ठराविक लोकांनाच तो दिसावा असं वाटत असेल तर तेही शक्य आहे. तसंच आपला स्टेटस कोणी वाचला हेदेखील पाहू शकतो. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांत मित्राने कोणते स्टेटस ठेवले होते हेदखील कळू शकतं. पण आपण ते डिलीट केल्यास मित्रांना ते पाहता येणार नाही. 
 
व्हॉट्सअॅपने हे फिचर युरोपमध्ये सुरु केलं असून इतर देशांमध्ये लवकरच सुरु करणार आहे. लवकरच हे फिचर अॅड्रॉईड, आयफोन आणि विंडोज युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.