लंडन : ब्रिटनमधील न्यूज ऑफ द वर्ल्ड या वृत्तपत्रच्या हॅकिंग प्रकरणात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा माजी प्रसिद्धीप्रमुख अँडी कौल्सन हा दोषी ठरला असून, त्याच्यावर हॅकिंगसाठी कट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अँडी कौल्सन याला कामावर ठेवल्याबद्दल पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी जाहीर माफी मागितली आहे.
अँडी कौल्सन याने न्यूज ऑफ द वर्ल्डचा संपादक असताना हे कारनामे केल्याचा आरोप आहे. ब्रिटनमधील, हा सर्वात महागडा खटला ठरला. विशेष वृत्त मिळविण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता.
अँडी कौल्सन यांची पूर्वाधिकारी व माध्यम सम्राट रुपर्ट मडरेक यांची सहकारी, रेबेका ब्रुक्स या प्रकरणी निदरेष सुटली असून, आठ महिने चाललेल्या या खटल्यात तिच्यावरील चारही आरोपाप्रकरणी तिला निदरेष ठरविण्यात आले आहे. रेबेका ब्रुक्स यांचे पतीही या प्रकरणी निदरेष ठरले आहेत. (वृत्तसंस्था)
डेव्हिड कॅमेरून यांचा माफीनामा
4ब्रिटनचे पंतप्रधान यांचा माजी प्रसिद्धीप्रमुख अँडी कौल्सन या खटल्यात दोषी ठरल्याने पंतप्रधान कॅमेरून अडचणीत आले आहेत. याप्रसंगी कॅमे:यासमोर बोलताना त्यांनी जाहीर माफी मागितली. 1क्, डाऊनिंग स्ट्रीटवर अँडी कौन्सलला ठेवणो ही आपली चूक असल्याचे त्यांनी कबूल केले. न्यूज ऑफ द वर्ल्ड सोडल्यानंतर त्याला आपण आणखी एक संधी दिली, पण ती चूकच ठरली असे कॅमेरून म्हणाले.
41,क्क्क् हून अधिक जणांना हॅकिंगचा फटका बसला. यात राणी एलिझाबेथ यांचा नातू, प्रिन्स विल्यम व हॅरी, आणि विल्यम यांची पत्नी केट यांचा समावेश आहे. सुमारे साडेपाच हजार जणांना या हॅकींगचा फटका बसल्याचा अंदाज आहे.
42क्क्क्-क्3 या ब्रुक्स यांच्या संपादकपदाच्या काळातील केवळ 12 हॅकींग प्रकरणांनाच दुजोरा मिळाला आहे. राजकारणी, सेलिब्रिटी, ख्यातनाम खेळाडू आणि अक्षरश: पत्रकारांनाही यामध्ये लक्ष्य करण्यात आले होते.
दीर्घ परंपरेचे दैनिक बंद
4168 वर्षाची परंपरा असलेले ‘द न्यूज ऑफ द वर्ल्ड’ हे टॅब्लॉईड या घटनेनंतर जुलै 2क्11मध्ये बंद करण्यात आले.
कौल्सन याची चलाखी
4गेली सात वर्षे अँडी कौल्सन हॅकिंगबाबत आपल्याला काहीही माहीत नाही असे सांगत होता; पण न्यायालयात त्याने ब्रिटनचे माजी गृहमंत्री विल्यम ब्लँकेट यांचा व्हॉईस मेल 2क्क्4 साली ऐकल्याचे कबूल केले. कॅमेरून यांच्याकडे काम करण्यापूर्वी तीन वर्षे आधीची ही तारीख आहे. या वृत्तपत्रतर्फे चाललेल्या हॅकिंग प्रक्रियेतील काहीही आपल्याला माहीत नाही असा त्याचा दावा होता. गतवर्षी त्याला या खटल्यात आणण्यात आले. 2क्क्7 साली त्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्याचा एक रिपोर्टर हॅकिंग करत असताना त्याने वार्ताहराला काही शिक्षा केली नाही, हा प्रकार संशयास्पद ठरला.