शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव कुत्र्यांपायी मोडला संसार

By admin | Updated: September 9, 2015 16:15 IST

पाळीव कुत्र्यांपायी बेंगळुरुत एका नवविवाहीत दाम्पत्याचे लग्न तुटले आहे. कुत्रे किंवा सासर यापैकी एक पर्याय निवड असा पतीने सांगितले असताना त्याची पत्नी दोन्ही कुत्र्यांना घेऊन माहेरी निघून गेली.

ऑनलाइन लोकमत

बेंगळुरु, दि.  ९ - पाळीव कुत्र्यांपायी बेंगळुरुत एका नवविवाहीत दाम्पत्याचा संसार मोडला आहे . कुत्रे किंवा सासर यापैकी एक पर्याय निवड असा पतीने सांगितले असताना त्याची पत्नी दोन्ही कुत्र्यांना घेऊन माहेरी निघून गेली. बेंगळुरुमधील या घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

बेंगळुरुत राहणा-या राजेशचे (नाव बदललेले)  २०१४ मध्ये केरळमध्ये राहणा-या चित्रा (नाव बदललेले) या तरुणीशी  लग्न झाले होते. हे दोघेही उच्चशिक्षीत असून चांगल्या कंपनीत नोकरीही करतात. लग्नाच्या एक आठवड्यानंतर  चित्राने माहेरुन दोन लॅब्रेडोर कुत्रे आणले. हे दोन्ही कुत्रे माझ्यासोबतच राहतील असे तिने सासरच्या मंडळींना सांगितले. सासरच्या मंडळींनी यावर आक्षेपही घेतला मात्र चित्रा तिच्या निर्णयावर ठाम होती. काही दिवसांनी ती पुन्हा कुत्र्यांना माहेरी सोडून येईल अशी आशा त्यांना होती. हे दोन्ही कुत्रे दिवसरात्र चित्रासोबत असायचे. अगदी पार्टीला जातानाही चित्रा कुत्र्यांना सोबत घेऊन जायची असे राजेशच्या कुटुबीयांचे म्हणणे आहे. रात्री झोपतानाही हे कुत्रे चित्रासोबत असायचे, त्यामुळे पत्नीसोबत एकांत मिळायचा नाही असा दावाही राजेशने केला आहे. तर 'हे कुत्रे माझे जीव की प्राण असून मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही' असे चित्राचे म्हणणे होते. 

राजेश - चित्रामधील वाद विकोपाला गेल्यावर हे प्रकरण बेंगळुरु पोलिसांकडे गेले. बेंगळुरु पोलिसांंच्या महिला तक्रारण निवारण केंद्राकडे हे प्रकरण सोपवण्यात आले. केंद्रातील काऊन्सिलर्सनी राजेश व चित्राची समजूत काढून वाद संपुष्टात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र चित्रा तिच्या निर्णयावर ठाम असल्याने तोडगा निघाला नाही अशी माहिती केंद्रातील पोलिसांनी दिली. पती -पत्नीमधील संबंध घरातील पाळीव प्राण्यांमुळे तुटण्याचे प्रकार वाढत असून ही बाब चिंताजनक असल्याचे केंद्रातील वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले.