शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप चालकांचा संप मागे

By admin | Updated: June 14, 2017 19:45 IST

देशभर पेट्रोलचे दर रोज बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात 16 जूनपासून पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - देशभर पेट्रोलचे दर रोज बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात 16 जूनपासून पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे. पेट्रोल पंप चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यामुळे पेट्रोलचे दर रोज बदलण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयाला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
सरकारने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही, असे म्हणत पेट्रोलपंपमालकांनी 16 जूनपासून संप पुकारला होता. सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून 16 जूनपासून पेट्रेल व डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, आता हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पाहून आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल इंधनाच्या किमतीचा आढावा दर दोन आठवड्यांंनी घेतात. पाँडेचरी, चंदिगढ, जमशेदपूर, उदयपूर आणि विशाखापट्टणम येथे पेट्रोलच्या किमती रोजच्या रोज बदलण्याचा १ मेपासून करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर तो देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  
 
सद्यस्थितीला भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात.  या तीन कंपन्यांचे इंधन बाजारावर 95 टक्के नियंत्रण असून, त्यांचे देशभरात जवळपास 58 हजार पेट्रोल पंप आहेत. विकसित देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलले जातात. यामुळे तेल कंपन्यांचे नुकसानाचे प्रमाण कमी होईल असा दावा केला गेला होता.