पेट्रोल २.४३ तर डिझेल ३.६० रुपयांनी स्वस्त
By admin | Updated: August 1, 2015 00:01 IST
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत झालेली मोठी घट लक्षात घेऊन सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर २.४३ रुपयांनी आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३.६० रुपयांची कपात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलसोबतच विनाअनुदानित गॅस सिलिंडरही २३.५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलची ही दरकपात शुक्रवारच्या मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आली असल्याचे इंडियन ऑईल कापार्ेरेशनने म्हटले आहे.
पेट्रोल २.४३ तर डिझेल ३.६० रुपयांनी स्वस्त
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत झालेली मोठी घट लक्षात घेऊन सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर २.४३ रुपयांनी आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३.६० रुपयांची कपात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलसोबतच विनाअनुदानित गॅस सिलिंडरही २३.५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलची ही दरकपात शुक्रवारच्या मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आली असल्याचे इंडियन ऑईल कापार्ेरेशनने म्हटले आहे. अनुदानित गॅस सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना विकत घ्यावे लागणारे विनाअनुदानित गॅस सिलिंडर (१४.२ किलो) शुक्रवारपासून २३.५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आता ६०८.५० रुपयांऐवजी ५८५ रुपयाला मिळेल, अशी माहिती इंडियन ऑईल कापार्ेरेशनने दिली आहे. याआधी १ जुलै रोजी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात १८ रुपये कपात करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)