शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल स्वस्त, डिङोल महाग

By admin | Updated: August 31, 2014 03:45 IST

पेट्रोल प्रतिलीटर 1 रुपया 82 पैशांनी स्वस्त केल्याने महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळणार असला, तरी डिङोल प्रतिलीटर 50 पैशांनी महाग करून हादराही देण्यात आला आहे.

फटका बसणार : एका हाताने दिले, दुस:या हाताने घेतले
नवी दिल्ली : पेट्रोल प्रतिलीटर 1 रुपया 82 पैशांनी स्वस्त केल्याने महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळणार असला, तरी डिङोल प्रतिलीटर 50 पैशांनी महाग करून हादराही देण्यात आला आहे. सर्व आवश्यक वस्तूंसह मालवाहतुकीचा डोलारा डिङोलवरच असल्याने महागाईची धग आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने एका हाताने दिलासा देत दुस:या हाताने महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला तडाखाही दिला आहे.
सुधारित दर शनिवारी मध्यरात्रीपासूनच लागू होणार असल्याचे तेल कंपन्यांनी घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर उतरल्याने पेट्रोलचे दर प्रतिलीटर 1 रुपया 51 पैशांनी स्वस्त करण्यात आले आहे. स्थानिक विक्रीकर आणि व्हॅटसह दिल्लीत पेट्रोल 1 रुपया 82 पैशांनी स्वस्त होईल. दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर प्रतिलीटर 7क्.33 रुपये असून, तो आता सुधारित दरानुसार प्रतिलीटर 68 रुपये 51 पैसे होईल.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
आंतरराष्ट्रीय बाजाराशी मेळ 
आंतरराष्ट्रीय बाजाराशी मेळ राखण्यासाठी डिङोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय जानेवारी 2क्13 मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार डिङोलचे दर 5क् पैशांनी वाढविण्यात आले आहेत, असे तेल विपणन कंपनीच्या सूत्रंनी सांगितले. तथापि, स्थानिक करानुसार पेट्रोलच्या दरात तफावत राहील.
 
चालू महिन्यात पेट्रोल दरात करण्यात आलेली ही तिसरी कपात होय. 1 ऑगस्ट रोजी पेट्रोल दर 9क् पैशांनी कमी करण्यात आले. त्यानंतर पुन्हा 1 रुपया 81 पैशांनी कमी केले होते.
 
विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात 
कच्च्या तेलाचे भाव उतरल्याने  विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरही 19 रुपयांनी स्वस्त केले आहे, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सरकारी तेल विपणन कंपनीने सांगितले. 
 
प्रत्येक कुटुंबासाठी निर्धारित 
कोटा (वर्षाकाठी सवलतीचे 12 सिलिंडर) संपल्यानंतर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागते. दिल्लीत सबसिडीतील एलपीजी सिलिंडरचा दर (प्रति 14.2 किलो) 414 रु. आहे, तर विनाअनुदानित सिलिंडरचा दर सध्या 92क् रुपये असून, तो उद्यापासून 9क्1 रुपये होईल.
 
याशिवाय ठोक डिङोलच्या दरातही कपात करण्यात आली आहे. दिल्लीत ठोक डिङोलच्या दरात प्रतिलीटर 1.32 रुपयांची घट केली आहे. सरकारी धोरणानुसार रेल्वे, संरक्षण, मार्ग परिवहन महामंडळ यासारखे ठोक ग्राहक बाजारातील दरानुसार डिङोल खरेदी करतात.