शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

By admin | Updated: June 15, 2017 20:49 IST

पेट्रोलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 12 पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 24 पैशांनी स्वस्त झाले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - पेट्रोलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 12 पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 24 पैशांनी स्वस्त झाले आहेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीच्या कमी झाल्यानं ही दरकपात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी काहीशी दिलासादायक गोष्ट आहे.तत्पूर्वी देशभर पेट्रोलचे दररोज बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात 16 जूनपासून पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेला संप मागे घेतला होता. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पेट्रोल पंप चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. सरकारने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही, असे म्हणत पेट्रोल पंप मालकांनी 16 जूनपासून संप पुकारला होता. सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून 16 जूनपासून पेट्रेल व डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, आता हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पाहून आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल इंधनाच्या किमतीचा आढावा दर दोन आठवड्यांनी घेतात. पुद्दुचेरी, चंदीगढ, जमशेदपूर, उदयपूर आणि विशाखापट्टणम येथे पेट्रोलच्या किमती रोजच्या रोज बदलण्याचा 1 मेपासून करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर तो देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सद्यस्थितीला भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. या तीन कंपन्यांचे इंधन बाजारावर 95 टक्के नियंत्रण असून, त्यांचे देशभरात जवळपास 58 हजार पेट्रोल पंप आहेत. विकसित देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलले जातात. यामुळे तेल कंपन्यांचे नुकसानाचे प्रमाण कमी होईल असा दावा केला गेला होता.