शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोगेटचा गुन्हा गोपनीयता अंतर्गतच

By admin | Updated: April 28, 2015 01:25 IST

पेट्रोलियम मंत्रालयातील दस्तऐवज लीकप्रकरणी करण्यात आलेल्या गुन्ह्याचा अंतर्भाव कार्यालयीन गोपनीयता कायद्यात होतो आणि या संदर्भातील तपास सुरू आहे,

नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयातील दस्तऐवज लीकप्रकरणी करण्यात आलेल्या गुन्ह्याचा अंतर्भाव कार्यालयीन गोपनीयता कायद्यात होतो आणि या संदर्भातील तपास सुरू आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली.ज्युबिलंट एनर्जीचे अधिकारी सुभाष चंद्रा यांनी दस्तऐवजांचे सहा संच बेकायदेशीररीत्या आपल्या जवळ बाळगले होते. यापैकी एकही दस्तऐवज जवळ बाळगण्याचा चंद्रा यांना अधिकार नाही. हे संच त्यांच्याजवळून जप्त करण्यात आले आहेत. असे दस्तऐवज बाळगणे हा कार्यालयीन गोपनीयता कायद्यान्वये गुन्हा आहे, असे सांगून दिल्ली पोलिसांनी चंद्रा यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. चंद्रा आणि अन्य ११ जणांविरुद्ध या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आपल्या अशिलाच्या ताब्यातून एकही गोपनीय दस्तऐवज हस्तगत करण्यात आलेले नाही, असे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे आणि तपासादरम्यान पोलिसांनी चंद्रा यांच्याजवळून मोबाइल फोन वा लॅपटॉप जप्त केलेला नाही असल्याचे चंद्रा यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. चंद्रा हे दोन महिन्यांपासून कस्टडीत आहेत. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी हा दावा खोडून काढला. चंद्रा आणि सहआरोपी ललता प्रसाद यांच्यादरम्यान १ मार्च २०१४ ते १७ फेब्रुवारी २०१५ या काळात ५० वेळा फोनवर बोलणी झाली. चंद्रा आणि त्यांच्या कंपनीने या दस्तऐवजांचा कसा वापर केला याची चौकशी सुरू आहे आणि ज्युबिलंट एनर्जीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाइल फोन व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत, असे फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले. जामीन अर्ज फेटाळला : मुख्य महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल यांनी या पेट्रोगेट प्रकरणातील आरोपी पत्रकार शांतनू सायकिया याचा जामीन अर्ज खारीज केला. सायकिया हा अन्य १२ आरोपींपैकी एक आरोपी आहे. सायकियाच्या ताब्यातून गोपनीय दस्तऐवज हस्तगत केले आहेत, असे सांगून पोलिसांनी त्याच्या जामिनाला विरोध केला. सायकिया हा इंडिया पेट्रो ग्रुप नावाने एक वेबपोर्टल चालवायचा आणि गोपनीय दस्तऐवजांचे विश्लेषण करायचा व ते ग्राहकांना विकायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.