शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची गर्भपातासाठी कोर्टात याचिका

By admin | Updated: June 24, 2017 02:44 IST

गर्भातील भ्रूणाला गंभीर आजार असल्यामुळे गर्भपात करू इच्छिणाऱ्या महिलेच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वैद्यकीय मंडळाची स्थापना केली.

नवी दिल्ली : गर्भातील भ्रूणाला गंभीर आजार असल्यामुळे गर्भपात करू इच्छिणाऱ्या महिलेच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वैद्यकीय मंडळाची स्थापना केली. सात डॉक्टरांचा समावेश असलेले हे मंडळ महिला व भ्रूणाची आरोग्य तपासणी करून वस्तुस्थिती जाणून घेणार आहे. कोलकात्याची ही महिला २४ आठवड्यांची गर्भवती आहे. गर्भपात कायदा १९७१ नुसार, २० हून अधिक आठवडे झाल्यानंतर गर्भपात करता येत नाही. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या सुटीकालीन पीठाने वैद्यकीय मंडळाला २९ जूनपर्यंत आपला अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश दिले. या मंडळाला संबंधित महिला आणि तिच्या उदरात वाढत असलेल्या भ्रूणाच्या आरोग्याची तपासणी करायची आहे. अशा प्रकारची गंभीर विकृती असलेले हे बाळ कदाचित पहिल्या शस्त्रक्रियेतच वाचू शकणार नाही, असा अहवाल एका डॉक्टरने दिला असून, न्यायालयाने त्या अहवालाचीही दखल घेतली आहे. भ्रूणात गंभीर विकृती असून, ती आईच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आम्हाला २४ आठवड्यांचा गर्भ काढून टाकण्याची मुभा द्यावी, अशी विनंती संबंधित महिला आणि तिच्या पतीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. वैद्यकीय प्रक्रियेद्वारे गर्भपात करण्याबाबतच्या कायद्याच्या (१९७१) कलम ३ (२) (ब) च्या घटनात्मकतेला आव्हान देण्यासह याचिकाकर्त्याने आई आणि गर्भातील बाळाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याची विनंती केली होती. या तरतुदीनुसार, २० आठवड्यांपर्यंतच गर्भपात करता येतो. गर्भाला २१ आठवडे झाल्यानंतर भ्रूणात गंभीर व्यंग असल्याचे आढळल्यापासून महिला मानसिकरीत्या खचली आहे. आज तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे.