शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

दिव्यांगांसह, सर्वांना एकत्र आणणारे लोकमत व त्रिनयनी प्रस्तुत राष्ट्रगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 07:00 IST

भारताच्या 71व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र व गोव्यातील पहिल्या क्रमांकाचं दैनिक लोकमत आणि ना नफा तत्वावरील एनजीओ त्रिनयनी आणत आहेत एक ...

ठळक मुद्देविविध समस्यांचा सामना करत असलेल्या दिव्यांगांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले एका शाळेच्या प्रांगणात हे शुटिंग करण्यात आले असून यामध्ये एकूण 30 जणांचा सहभाग आहेविविधतेचा संपूर्ण अर्क या फिल्ममध्ये उतरला असून त्यातून एकत्रितता ही दिसून येते

भारताच्या 71व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र व गोव्यातील पहिल्या क्रमांकाचं दैनिक लोकमत आणि ना नफा तत्वावरील एनजीओ त्रिनयनी आणत आहेत एक फिल्म जिच्यामध्ये सामान्यांबरोबरच दिव्यांगांनाही एकत्र आणण्यात आलं आहे. विशेष गुण असलेल्या व चमकदार कामगिरी केलेल्या दिव्यांगांच्या प्रती लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी असा प्रयत्न लोकमतने या कलाकृतीच्या माध्यमातून केला आहे. या फिल्मचा गाभा सर्वसमावेशक भारत असा असून दिव्यांगांच्या बरोबरच सर्वसाधारण लोकांनी एकत्रितरीत्या राष्ट्रगीत गायले आहे.दृष्टीहीन, मूकबधीर, गतीमंद आदी व्यंग असलेल्यांबरोबरच समलैंगिकांच्या प्रतिनिधींचा तसेच अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांचा सहभाग या फिल्ममध्ये करण्यात आला आहे. लोकमतच्या पुढाकाराने बनवण्यात आलेल्या या फिल्मला रितिका साहनी (गायिका, सामाजिक कार्यकर्ती, संस्थापक व विश्वस्त सदस्य - त्रिनयनी एनजीओ) यांनी मूर्त स्वरूप दिले आहे आणि टीम त्रिनयनीने हातभार लावला आहे. सर्वसमावेश भारत, एकत्र भारत या उपक्रमाची गरज असल्याचा प्रयत्न या फिल्मच्या माध्यमातून करण्यात आला आहे.गायिका, सामाजिक कार्यकर्ती व त्रिनयनीची संस्थापक असलेल्या रितिका साहनी यांची ओळख सर्वसमावेशक व समानतेला प्राधान्य देणारा समाज निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेणारी व्यक्ती अशी आहे. त्यांच्या ध्येयानुरुप कार्यासाठी लोकमत वृत्त समूहानं साहनी यांनी आमंत्रित केले आणि या फिल्मची निर्मिती केली. विविध समस्यांचा सामना करत असलेल्या दिव्यांगांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि राष्ट्रगीतीचे रेकॉर्डिंग व शुटिंग करण्यात आले.

एका शाळेच्या प्रांगणात हे शुटिंग करण्यात आले असून यामध्ये एकूण 30 जणांचा सहभाग आहे, ज्यामध्ये 17 दिव्यांग मित्रमंडळी आहेत. वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या व क्षमतांच्या लोकांना एकाच छत्राखाली आणण्यात आले असून यामध्ये व्हीलचेअरचा वापर करणाऱ्या, चिन्हांची भाषा वापरणाऱ्यांचा, अपंगांचा, अॅसिड अॅटॅकमधून वाचलेल्यांचा, समलैंगिक समाजाचे प्रतिनिधी असलेल्यांचा समावेश आहे. हा व्हिडीओ सर्वसमावेशक करण्यासाठी सर्वसामान्य किंवा सुदृढांचाही समावेश करण्यात आला आहे. विविधतेचा संपूर्ण अर्क या फिल्ममध्ये उतरला असून त्यातून एकत्रितता ही दिसून येते. त्रिनयनीला कुठल्या प्रकारचा समाज अपेक्षित आहे हे ही त्यातून ध्वनीत होते. या फिल्मच्या निर्मितीत सहभागी असलेल्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडणाऱ्या आनंदातून हे स्पष्ट होत होते की या उपक्रमामुळे किती आनंदी वातावरणनिर्मिती झाली आहे. लोकमत व त्रिनयनीचं पाठबळ व मार्गदर्शन आणि सगळ्या सहभागींच्या सहयोगाखेरीज हे शक्य झालं नसतं. या फिल्ममध्ये स्नेहा जावळे (अॅसिड हल्ल्यातील पिडीत व करमवीर चक्रविजेती), राहूल रामुगडे (पॅरा स्विमर, महाराष्ट्र व व्हीलचेअर बास्केटबॉल प्लेअर व राज्यपातळीवरील सुवर्णपदक विजेता स्विमर),  नीनू केवलानी (मिस व्हीलचेअर इंडिया), रमेश मिश्रा (राज्य पातळीवरील पॅरा ऑलिंपिक चँपियन) यासह अन्यांचा सहभाग आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन