शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएस’कडून छळ; प्रज्ञासिंह यांचा आरोप

By admin | Updated: April 28, 2017 01:48 IST

भगवा दहशतवादाचा बागुलबुवा करून केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने रचलेल्या कटकारस्थानात मला गोवण्यात आले.

भोपाळ : भगवा दहशतवादाचा बागुलबुवा करून केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने रचलेल्या कटकारस्थानात मला गोवण्यात आले. दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या छळामुळे मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचली होती; परंतु अंतरात्मा सहीसलामत होता, असे सांगत प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेस आणि एटीएसवर गंभीर आरोप केले.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्या पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलल्या. काँग्रेस आणि एटीएसवर त्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, भगवा दहशतवाद या शब्दाचे जनक पी. चिदंबरम आहेत. कटकारस्थान रचून मला भगव्या दहशतवादाखाली अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. २० आॅक्टोबर २०१० रोजी एटीएसने (सुरत) जेव्हा मला बेकायशीररीत्या ताब्यात घेतले तेव्हा मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होती. एटीएसने केलेल्या छळाला इतिहासात तोड नाही, असा गंभीर आरोप करीत त्यांनी एटीएसचे हेमंत करकरे, खानविलकर यांची नावे घेतली. पाच दिवस मी व्हेन्टिलेटरवर होती. आज मला इतरांवर विसंबून राहावे लागते.माजी गृहमंत्री चिदंबरम यांनी ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. तथापि, असा कोणताही प्रकार नाही. नऊ वर्षे मी तुरुंगात काढली. माझी पूर्वीच सुटका व्हायला हवी होती. अखेर माझी सुटका करण्यात आली आहे. तथापि, मला पुढेही उपचार घ्यावे लागणार आहेत, असे त्यांनी सांगितले. तुरुंगातून सुटका झाल्याने मला थोडासा दिलासा जरूर मिळाला आहे, असे सांगत त्यांनी कोर्टाचे आभार मानले. पत्रकार परिषदेची सुरुवात त्यांनी ‘भारत माता की जय’ अशा जयघोषाने केली.