शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बांधकामांसाठी नळजोडण्यांना परवानगी महापालिका : बंदी मागे घेण्याची कार्यवाही सुरू

By admin | Updated: August 7, 2016 00:44 IST

नाशिक : महापालिकेने शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर नवीन बांधकामांच्या ठिकाणी नळजोडणी देण्यास बंदी घातली होती. आता शहरात समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने महापालिकेने सदर बंदी मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली असून, लवकरच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

नाशिक : महापालिकेने शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर नवीन बांधकामांच्या ठिकाणी नळजोडणी देण्यास बंदी घातली होती. आता शहरात समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने महापालिकेने सदर बंदी मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली असून, लवकरच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.गंगापूर धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे महापालिकेने दि. ९ ऑक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी पाण्याची बचत करण्यासाठी शहरातील बांधकामांच्या ठिकाणी देण्यात आलेल्या नळजोडण्या बंद करण्यात आल्या होत्या शिवाय नवीन बांधकामांना नळजोडण्या देण्यास मनाई केली होती. नवीन बांधकामांच्या ठिकाणी बव्हंशी व्यावसायिकांकडून विंधणविहिरींचे पाणी वापरले जात असल्याने त्यांच्यावर फारसा परिणाम जाणवला नाही, परंतु ज्याठिकाणी असलेल्या नळजोडण्या बंद करण्यात आल्याने काही इमारतींमध्ये वास्तव्यास आलेल्या रहिवाशांची मात्र गैरसोय झाली. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात समाधानकारक पाऊस झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने महापौरांनी आठवड्यातील दर गुरुवारची पाणीकपातही रद्द केली आहे, तर बंद केलेले तरणतलावही खुले केले आहेत. आता नवीन बांधकामांसाठी पुन्हा नळजोडण्यांकरिता परवानगी देण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने अतिरिक्त आयुक्तांपुढे ठेवला असून, लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन बांधकामांना नळजोडण्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पूर्ण झालेल्या बांधकामांना मिळणार दिलासाशहरात सद्यस्थितीत राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयामुळे असंख्य बांधकामांना परवानगी मिळविणे अवघड होऊन बसले आहे. पाणीकपातीमुळे बांधकामांना नळजोडण्याही देणे थांबविले गेले होते. मात्र, ज्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहेत, परंतु त्यांना अद्याप पूर्णत्वाचा दाखला प्राप्त होऊ शकलेला नाही. त्यांना आता नळजोडणीसाठी बांधकामाच्या दरात परवानगी मिळविणे शक्य होणार आहे.