पीपल्स बँक अध्यक्षपदी पुन्हा भालचंद्र पाटील बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी प्रकाश कोठारी
By admin | Updated: April 13, 2016 00:19 IST
जळगाव : दि.जळगाव पीपल्स को.-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी डॉ.प्रकाश कोठारी यांची निवड करण्यात आली.
पीपल्स बँक अध्यक्षपदी पुन्हा भालचंद्र पाटील बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी प्रकाश कोठारी
जळगाव : दि.जळगाव पीपल्स को.-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी डॉ.प्रकाश कोठारी यांची निवड करण्यात आली.दि.जळगाव पीपल्स-को.-ऑप बँकेची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एन.डी.करे व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चेतन राणे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार मंगळवार १२ रोजी सकाळी ८ ते ८.१५ यावेळेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ दिला. या वेळेत अध्यक्षपदासाठी भालचंद्र पाटील तर उपाध्यक्षपदासाठी डॉ.प्रकाश कोठारी यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक दत्तात्रय चौधरी, दुर्गादास नेवे, डॉ.चंद्रकांत चौधरी, प्रा.विलास बारोले, सुनील पाटील, सुरेखा चौधरी, स्मिता पाटील, रामेश्वर जाखेटे, चंदन अत्तरदे, डॉ.सुहास महाजन, राजेश परमार, अनिकेत पाटील उपस्थित होते. बिनविरोध निवडीनंतर बँकेतर्फे सीईओ अनिल पाटकर तसेच अधिकारी व कर्मचार्यांतर्फे नवनियुक्त पदाधिकारी व संचालकाचा सत्कार करण्यात आला.