शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीपल्स बँक बिनविरोधची ८३ वर्षांची परंपरा निवडणूक : १४ जागांसाठी होत आहे मतदान

By admin | Updated: March 22, 2016 00:39 IST

जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून १४ जागांसाठी १० एप्रिल रोजी मतदान होत आहे. बँकेच्या स्थापनेपासून म्हणजे १९३३ पासून संचालक मंडळ बिनविरोध निवडीची परंपरा आहे. या निवडणुकीतदेखील बिनविरोध निवडीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत.

जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून १४ जागांसाठी १० एप्रिल रोजी मतदान होत आहे. बँकेच्या स्थापनेपासून म्हणजे १९३३ पासून संचालक मंडळ बिनविरोध निवडीची परंपरा आहे. या निवडणुकीतदेखील बिनविरोध निवडीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२०१६-२०२१ या पाच वर्षांसाठी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. १९ मार्च पासून नामनिर्देशन अर्ज विक्री व अर्जांची स्विकृती सुरू झाली असून २२ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत बँकेच्या सभागृहात अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. २३ मार्च रोजी अर्जांची छाननी होऊन त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता छाननी झालेल्या अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २८ ते ३१ मार्च दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत अर्ज मागे घेता येतील.
१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी पाच या वेळेत नेरी नाक्या नजीक यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृहात मतदान होणार आहे. याच ठिकाणी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून मतमोजणी होऊन मतमोजणी नंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येईल.
१४ जागांसाठी होणार निवडणूक
जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात मनपा क्षेत्रातील १२ जागा तर मनपा क्षेत्राबाहेरील दोन जागांचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात ९ जागा जनरल उमेदवारांसाठी आहे. एक जागा अनु.जाती व जमातीसाठी आहे. दोन जागा महिला राखीवसाठी आहे. मनपा क्षेत्राबाहेरील मात्र जिल्‘ातील एक जागेसाठी तर जळगाव जिल्‘ाबाहेरील एका जागेसाठी निवडणूक होत आहे.

बँकेच्या स्थापनेपासून बिनविरोधची परंपरा
जळगाव पीपल्स सहकारी बँकेची स्थापना ही १९३३ मध्ये झाली. यावेळी सोसायटीचा दर्जा देण्यात आला होता. संस्थापक संचालक रामदास लहानू पाटील यांची त्यावेळी बिनविरोध निवडीची परंपरा सुरु केली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने १९८४ मध्ये बँकिंग लायसन्स परवाना पीपल्स बँकेला प्रदान केला. पारदर्शकता, उत्कृष्ट सेवा याच्या बळावर बँकेने आजही आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.