शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे : राम शिंदे

By admin | Updated: July 19, 2015 21:34 IST

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नियोजनानुसार जनतेने प्रशासनाला सहकार्य करून आनंदाने कुंभपर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केले आहे. शहरातील साउंड सिस्टिमच्या औपचारिक उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नियोजनानुसार जनतेने प्रशासनाला सहकार्य करून आनंदाने कुंभपर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केले आहे. शहरातील साउंड सिस्टिमच्या औपचारिक उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
येथील कुशावर्तावर शाहीस्नानासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला खबरदारी घेण्यासाठी सूचना केल्या असून, येथे येणार्‍या भाविकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. कुशावर्ताची पाहणी करून त्यांनी पोलिसांनी केलेल्या नियोजनाविषयी माहिती घेतली. याच ठिकाणी लोटालोटी, चेंगराचेंगरी होण्याचा धोका आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका याच ठिकाणी मोलाची असून, संपूर्ण कुंभमेळ्यात पोलिसांचा रोल महत्त्वाचा ठरणार असल्याचे ते म्हणाले. कुशावर्तावर भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचे स्वागत केले व पालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले. रविवार सुटीचा दिवस असल्याने आणि त्यातही सिंहस्थ पर्वकाल सुरू असल्याने कुशावर्तावर सिंहस्थ स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, शिंदे यांनी गोदावरीवरील घाटांची पाहणी केली. कुशावर्तावर गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, म्हणून तीन घाट उभारण्यात आले असून, यातील दोन घाटांची शिंदे यांनी पाहणी केली. तत्पूर्वी त्र्यंबक येथे बांधलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. माने, डॉ. लोंढे यांनी तेथील व्यवस्थेची, इमर्जन्सी वॉर्ड, लिफ्टची माहिती दिली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले आदि मान्यवर उपस्थित होते. त्र्यंबकचा चेहरामोहरा पाहून घाट व्यवस्थेचे अवलोकन करून साधुग्राम पोलिसांसाठी तयार करण्यात आलेले रक्षकनगर, वाहनतळ आदिंची सखोल माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
चौकट
दंगलीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांची हरसूलला भेट
हरसूल येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी प्रथम हरसूलला भेट दिली. दंगलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी तेथील नागरिकांना शांततेचे आवाहन केले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम आदि अधिकारी उपस्थित होते.