पेन्शनला विलंब का?
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शनसाठी प्रतीक्षा करावी लागते. पेन्शनला विलंब का, असा प्रश्न मंगळवारी जि.प.पेन्शनर महासंघाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.विभाग प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांना चुकीची माहिती देतात. अहवाल वेळेवर पाठवत नाही. त्यामुळे आरोग्य, सिंचन, पाणी पुरवठा, बांधकाम आदी विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी प्रतीक्षा ...
पेन्शनला विलंब का?
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शनसाठी प्रतीक्षा करावी लागते. पेन्शनला विलंब का, असा प्रश्न मंगळवारी जि.प.पेन्शनर महासंघाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.विभाग प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांना चुकीची माहिती देतात. अहवाल वेळेवर पाठवत नाही. त्यामुळे आरोग्य, सिंचन, पाणी पुरवठा, बांधकाम आदी विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी प्रतीक्षा करावी लागते. अशी व्यथा मांडण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गंगोत्री, कार्याध्यक्ष एन.एल.सावरकर यांच्यासह जिल्ह्यातील पेन्शनधारक उपस्थित होते.(प्रतिनिधी)