शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘पीक विमा’ हे मोदी सरकारचे हुकमाचे पान

By admin | Updated: February 9, 2016 03:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा देशाला नव्या नाहीत; पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विमा योजनेचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, खुद्द पंतप्रधानच आता मैदानात उतरत आहेत

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा देशाला नव्या नाहीत; पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विमा योजनेचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, खुद्द पंतप्रधानच आता मैदानात उतरत आहेत. याच विषयाला केंद्रबिंदू बनवून फेब्रुवारीमध्ये त्यांच्या ४ राज्यांत ४ सभा आयोजित करण्यात येणार आहेत. दहा कोटींपेक्षा अधिक सदस्य, योजनांच्या प्रसिद्धीसाठी सरकारचे प्रभावी नेटवर्क, ‘मन की बात’चे देशभर थेट प्रसारण या साऱ्या गोष्टी असताना जाहीर सभांची इतकी मेहनत खुद्द पंतप्रधान कशासाठी करीत आहेत, अशी चर्चा सध्या राजधानीत सुरू आहे.मोदी सरकारची पीक विमा योजना युपीएच्या मनरेगाइतकीच प्रभावी आहे. ग्रामीण जनतेच्या ती दीर्घकाळ लक्षात राहू शकते. पीक विम्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे सारे श्रेय भाजपलाच मिळायला हवे, असे भाजप नेत्यांना वाटते. पंतप्रधानांच्या ४ सभांमुळे ही योजना ग्रामीण शेतकऱ्यांच्या मनात देशभर ठसवली जाऊ शकते; मात्र पंतप्रधानांच्या सभा जागोजागी आयोजित करण्यामागे केवळ तितकेच कारण नाही. मोदी सरकार सत्तेवर येऊ न २0 महिने उलटले. भाजप आणि केंद्र सरकारने जनतेशी जोडणाऱ्या अनेक योजनांच्या घोषणा या काळात केल्या. त्यापैकी अनेक योजनांची कार्यवाहीही सुरू झाली आहे. तरीही सर्वसामान्य जनतेत मोदी सरकारची प्रतिमा जशी हवी तितकी उंचावली नाही. उलट विरोधकांच्या आरोपांमुळे सरकारच्या विरोधातल्या नकारात्मक प्रचारालाच अधिक महत्त्व मिळत आहे. भू संपादन विधेयकाचे बुमरँग सरकारवर उलटले. केंद्र सरकार फक्त उद्योगपतींचे हितसंबंध सांभाळत असून, ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असा संदेश त्यातून पोहोचला. दादरीत अखलाकच्या हत्येनंतर भाजप आणि सरकारच्या विरोधात असहिष्णुतेच्या आरोपांचे वातावरण तापत गेले. जनतेच्या मनात साचलेली सरकारविरोधी ही नकारात्मक भावना दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी पीक विम्याचे निमित्त साधून ग्रामीण जनतेला नव्याने साद घालण्याचे ठरवले आहे.यंदा ५, तर पुढील वर्षी ६ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. यापैकी बहुतांश राज्यांत शेतीचे क्षेत्र मोठे आहे. या राज्यांमधे अपेक्षित यश न मिळाल्यास केंद्राच्या विरोधातील नकारात्मक वातावरण वाढतच जाईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यापूर्वी विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी भाजपने पीक विमा योजनेला हुकमाचे पान बनवले असून पंतप्रधानांच्या सभांद्वारे त्याचा प्रभावी प्रचार करण्याचे ठरवले आहे.