शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख कोटींचा पीडीएस घोटाळा

By admin | Updated: July 5, 2015 04:43 IST

महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीच्या(भाजपा)सरकारला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा छत्तीसगडकडे वळविला आहे. मुख्यमंत्री रमणसिंग

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीमहाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीच्या(भाजपा)सरकारला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा छत्तीसगडकडे वळविला आहे. मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या संगनमताने राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीत (पीडीएस) १ लाख ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसने रमण सरकारवर लावला आहे.देशातील हा सर्वात मोठा पीडीएस घोटाळा असल्याचा या पक्षाचा दावा आहे.काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी शनिवारी यासंदर्भात कागदोपत्री पुरावे सादर करताना सांगितले की, छत्तीसगड सरकारने एक रुपया किलो तांदूळ देण्याच्या आड तांदूळ गिरणी मालकांसोबत हजारो कोटी रुपयांची कमाई होऊ शकेल असे तंत्र विकसित केले आहे. मीठ,चणा, रॉकेल, गहू आदींच्या खरेदीच्या माध्यमाने नोटा छपाईचे यंत्र सुरू करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाडीत जप्त केलेल्या दस्तऐवजांवरून या आरोपांची पुष्टी केली जाऊ शकते.३६ कार्यालयांमधील धाडसत्रात ३ कोटी ६४ लाखांवर रक्कम जप्त करण्यात आली आहे. यावेळी मिळालेल्या नोंदवह्णा आणि इतर कागदपत्रांमध्ये ३,००० कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तपास संस्थेने शिवशंकर भट्टकडून ही डायरी जप्त केली होती. ही एकच डायरी नाही तर अरविंद ध्रुव यांच्या डायरीतूनही अनेक भंडाफोड होत आहेत. या भ्रष्टाचारात रमणसिंग, त्यांच्या पत्नी वीणा सिंग, साळी रेणुका सिंग, श्रीबहादूर थापा, के.के. बारीक, राजेश मुदत, पन्नुलाल आणि केदार आदी लोक सामील असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. मुख्यमंत्री रमणसिंग आणि त्यांच्या कुटुंबाचा बचाव करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे माकन यांनी सांगितले. काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून, भाजपाश्रेष्ठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.