पी़सी़ चाको यांचा राजीनामा!
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या लाजीरवाण्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्ष नेते पी़सी़ चाको यांनी पक्षाच्या दिल्ली प्रभारी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे़
पी़सी़ चाको यांचा राजीनामा!
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या लाजीरवाण्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्ष नेते पी़सी़ चाको यांनी पक्षाच्या दिल्ली प्रभारी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे़माझ्याकडे सोपवलेली जबाबदारी निभवण्यात मी अपयशी ठरलो़ दिल्लीतील पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी प्रभारीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे़ काँग्रेस या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती़ मात्र दिल्लीकरांनी अभूतपूर्व कौल दिला़ त्याचा आम्ही सन्मान करतो, असे चाको यांनी म्हटले आहे़