शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पगारी भिकारी गाणार मोदी सरकारचे गुणगान!

By admin | Updated: August 10, 2015 01:23 IST

कायम कुचेष्टेचा विषय ठरणाऱ्या भिकाऱ्यांना मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचे ठरविले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीन हजार भिकाऱ्यांची रोजगार भरती

नवी दिल्ली : कायम कुचेष्टेचा विषय ठरणाऱ्या भिकाऱ्यांना मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचे ठरविले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीन हजार भिकाऱ्यांची रोजगार भरती करताना त्यांच्याकडे सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत सोपविण्याची मोठी जबाबदारीची योजना आखली आहे.तर सावधान! तुमच्या शहरात आता आगळेवेगळे भिकारी येऊ लागतील. त्यांच्या अंगावर चिंध्या असतील किंवा सिल्कचे झबले असतील. त्यांच्या तोंडी नर्सरी गीत, भजने, भावगीते यापैकी काहीही नसेल असेल ते मोदी सरकारचे यशोगान. मोदी सरकारच्या उपलब्धींकडे लक्ष वेधण्याची ही अभिनव कल्पना अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अखत्यारीतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय प्रत्यक्षात उतरवणार आहे. धावत्या रेल्वेतही हे भिकारी मोदीगीत गाताना दिसतील. ‘स्वच्छ भारत’ ते ‘मेक इन इंडिया’प्रमाणे भिकाऱ्यांच्या रोजगार भरतीची योजनाही अनोखी ठरणार आहे.मोदी सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती लक्षवेधी गाण्यातून गाताना सरकारची प्रशंसा करण्यासाठी भिकाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाईल. रेल्वे प्रवाशांची भिकाऱ्यांकडून होणारी करमणूक हे दैनंदिन चित्र आता बदलून जाईल. भिकाऱ्यांच्या तोंडून हमखास ऐकू येणाऱ्या ‘आवारा हूँ’ आणि ‘चलती का नाम गाडी’ यांसारख्या जुन्या चित्रपट गीतांची जागा नव्या गाण्यांनी घेतलेली असेल. स्किल इंडिया, बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या सरकारी योजनांची गाणी ऐकायला येतील. मध्ययुगीन युरोपमध्ये किंवा बंगालमध्ये भिकाऱ्यांचा वापर केला जायचा. त्याच धर्तीवर उपयोगात आणल्या जाणाऱ्या भिकाऱ्यांना मोफत प्रवासाचा आनंद घेता येईल. मोदी सरकारच्या महत्त्वांकाक्षी योजनांची माहिती मौखिक आणि लेखी स्वरूपात दिली जाईल. व्यापक जनजागृतीसाठी तळागाळात मोहीम राबविताना सरकार पथनाट्ये आणि रस्त्याच्या कडेला भरविल्या जाणाऱ्या जादूच्या प्रयोगांसारख्या कार्यक्रमांचाही वापर करू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)