शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:36 IST

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडसावले : पंजाब, त्रिपुरा, कर्नाटकमध्येही तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाºयांचे वेतन वेळेत दिले नसल्याची माहिती केंद्र सरकारने सादर केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्यांना खडसावत वेळेत वेतन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

एका डॉक्टरने केलेल्या याचिकेवर न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी क्वारंटाइनमध्ये असल्यास त्यांचे त्या दिवसांतील वेतन कापले जाते शिवाय वेतनही वेळेवर देत नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. पंजाब, महाराष्ट्र, त्रिपुरा व कर्नाटक या राज्यांनी सूचना करूनही आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना वेळेवर वेतन दिले नसल्याची माहिती केंद्र सरकारने न्यायालयास दिली.कडक शब्दांत ताशेरे : सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत व नाराजी व्यक्त केली. त्रिपुरा, पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये चाचणी, तपासणी आणि इतर आरोग्य सेवा देणाºया कर्मचाºयांना योग्य वेळेत सुट्टी देण्यात यावी, असेही कोर्टाने नमूद केले आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई कराकेंद्र सरकारने तसेच आरोग्य विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेले आदेश तसेच मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत नसेल तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये केंद्र सरकारने राज्यांवर कार्यवाही करावी, असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, येत्या १० आॅगस्टला या प्रकरणावर पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.विलगीकरण कालावधीतील वेतन कापता येणार नाहीडॉक्टरांच्या विलगीकरणाच्या कालावधीस रजेत परावर्तित करू नये. या कालावधीतील त्यांचे वेतन कापता येणार नाही, अशा सूचनाही कोर्टाकडून देण्यात आल्या.यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना देऊन न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या