शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तपासात लक्ष घाला; सुशांतसिंहच्या बहिणीचे पंतप्रधान मोदी यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 23:46 IST

श्वेताने इन्स्टाग्रामवर लिहिले पत्र । न्यायव्यवस्थेवर व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात तातडीने लक्ष घाला, अशी विनंती सुशांतची बहीण श्वेतासिंग कीर्ती हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट करून ही मागणी केली आहे. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही तिने नमूद केले आहे.बॉलिवूडचा उगवता स्टार असलेल्या सुशांतसिंग याचा १४ जून रोजी मुंबईत रहस्यमरीत्या मृत्यू झाला होता. त्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. सुशांतसिंहचे वडील के.के. सिंग यांनी अलीकडेच पाटणा येथे सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी तिच्यावर ठेवला आहे.

‘मी सुशांतसिंह राजपूतची बहीण आहे. मी आपणास विनंती करते की, या संपूर्ण प्रकरणात तातडीने लक्ष घालून तपास करण्यात यावा. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळायलाच हवा, अशी आमची अपेक्षा आहे’, असे श्वेतासिंग कीर्ती हिने इन्स्टाग्रावरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांना उद्देशून लिहिले आहे. या पोस्टमध्ये तिने पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयास टॅग केले आहे.श्वेतासिंग कीर्ती हिने आपल्या पत्रवजा पोस्टमध्ये पंतप्रधानांना उद्देशून लिहिले की, ‘प्रिय सर, माझे हृदय मला सांगतेय की, तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहाल. आम्ही एका साध्या कुटुंबातील लोक आहोत. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता, तेव्हा त्याला कोणी गॉडफादर नव्हता, आताही आमच्या बाजूने कोणी नाही. माझी आपणास विनंती की, आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. पुराव्यात हेराफेरी होणार नाही, याची सुनिश्चितता करावी.’बिहार पोलिसांकडून तपास सुरूसुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काही लोक करीत आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हटले होते की, ‘मुंबई पोलिसांच्या तपासाविषयक कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न दु:खदायक आहे.’ सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, बिहार पोलिसांचे एक पथक सध्या मुंबईत आलेले आहे.