शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पटनाईक, जयललिता NDA ला पाठिंबा देणार?

By admin | Updated: May 14, 2014 13:00 IST

भाजपा प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ जाणार हे निश्चित झाले असताना बिजू जनता दल व जयललिता यांचा एआयडीमेके हे पक्षही एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत मिळाले आहेत.

ऑनलाइन टीम
भुवनेश्वर, दि. १४ - भाजपा प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ जाणार हे निश्चित झाले असताना बिजू जनता दल व जयललिता यांचा एआयडीमेके हे पक्षही एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत मिळाले आहेत. तसे झाले तर एनडीएला सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. बीजेडीला या निवडणुकीत १५ जागा तर जयललितांच्या एआयडीएमकेला २५ जागा मिळण्याची शक्यता एग्झिट पोल्समध्ये व्यक्त झाली आहे. त्यामुळे रालोआला किमान अंदाजित असलेल्या २५० जागा जिंकता आल्या तरी बीजेडी व एआयएडीमेकेच्या एकूण ४० जागांच्या आधारे २७२चा पल्ला आरामात पार पाडता येणार आहे.
बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी आपला पक्ष काँग्रेस व भाजपा या दोघांशीही समान अंतर राखून असल्याचे सांगितले. याआधी नरेंदर मोदी हे पंतप्रधान बनण्यायोग्य नसल्याचे विधान पटनाईक यांनी केले होते, त्याचप्रमाणे तिस-या आघाडीची चाचपणीही पटनाईक यांनी केली होती. परंतु आता मात्र बीजेडीतील एका ज्येष्ठ नेत्याने ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी असल्याचे सांगितले. तसेच नवीन सरकारला विशिष्ट अटीवर पाठिंबा दर्शवण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सुचित केले. त्यामुळे ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची माणी मान्य केली तर भाजपा प्रणित रालोआला बीजेडी पाठिंबा देऊ शकते असे दिसत आहे.
दरम्यान, जयललिता व नरेंद्र मोदी यांचे परस्पर संबंध अत्यंत चांगले असून एआयडीएमके हा पक्ष रालोआला पाठिंबा देऊ शकतो असे त्यांनी सुचित केले. मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली त्यावेळी जयललिता उपस्थित होत्या. याशिवायही या दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे मजबूत स्थितीत असलेल्या रालोआला एआयडीएमके पाठिंबा देऊ शकतो अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर बीजेडी व एआयडीएमके रालोआमध्ये सामील झाले तर २७२ चा आकडा आरामात पार होईल असा कयास असून, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल असे स्पष्ट दिसत आहे.