शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या निकालावरून पाटणा हायकोर्टात गदारोळ; न्यायाधीशाकडून काम काढून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 04:59 IST

पाटणा : बिहारच्या न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. त्याला आळा घालण्याऐवजी पाटणा उच्च न्यायालय त्यावर पांघरुण घालत आहे, असे ...

पाटणा : बिहारच्या न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. त्याला आळा घालण्याऐवजी पाटणा उच्च न्यायालय त्यावर पांघरुण घालत आहे, असे खासगी मत एका न्यायाधीशाने खुद्द निकालपत्रातच नोंदविल्याने गदारोळ उडाला आहे. मुख्य न्यायाधीशांनी प्रशासकीय आदेश काढून या न्यायाधीशाकडील न्यायिक काम काढून घेतले तर ११ न्यायाधीशांचे विशेष पूर्णपीठ बसवून हे आक्षेपार्ह निकालपत्र पूर्णांशाने स्थगित केले.

न्या. राकेश कुमार यांनी बुधवारी एका जामीन अर्जावर दिलेल्या २८ पानी निकालपत्रावरून हा गहजब उडाला आहे. न्या. कुमार यांनी या निकालपत्राची प्रत सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालायचे ‘कॉलेजियम’, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयास पाठविण्याचे निर्देशही दिले होते.न्या. कुमार यांनी दिलेले हे निकालपत्र ‘न्यायालयीन पदांची उतरंड व न्यायालयीन सचोटीवर घाला घालणारे तसेच न्यायसंस्थेची आब धुळीस मिळविणारे आहे, असे नमूद करून, पूर्णपीठाने हे निकालपत्र पूर्णपणे निलंबित केले. हे मूळ निकालपत्र मुख्य न्यायाधीशांच्या ताब्यात ठेवण्यात यावे व ते बाहेर कोणालाही पाठविले जाऊ नये, असेही पूर्ण पीठाने नमूद केले.

एका भ्रष्टाचार प्रकरणात निवृत्त सनदी अधिकारी के. पी. रामय्या यांचा अटकपूर्व जामीन न्या. कुमार यांनी पूर्वी फेटाळला होता. तरी पाटणा येथील ‘एसीबी’ विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी रामय्या यांना जामीन मंजूर केला. याची स्वत:हून दखल घेत न्या. कुमार यांनी हा जामीन देताना काही भ्रष्टाचार झाला का याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांना दिले. ते एवढे करूनच थांबले नाहीत. बिहारच्या न्यायसंस्थेत अगदी उघडपणे भ्रष्टाचार चालतो व अशा भ्रष्ट न्यायाधीशांना दंडित करण्याऐवजी त्यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण करणारे उच्च न्यायालयातील न्यायाधीश त्यांना पाठीशी घालतात, असा आरोपही केला. (वृत्तसंस्था) 

उच्च न्यायालयात मी स्वत: न्यायाधीश झाल्यानंतर वरिष्ठ न्यायाधीश मुख्य न्यायाधीशांना लोणी लावतात, असे माझ्या निदर्शनास आले. ते असे का करत असावेत, असा मला प्रश्न पडायचा. पण नंतर लक्षात आले की, आपल्या मर्जीतील किंवा जातीतील व्यक्तींची कनिष्ठ न्यायालयांत न्यायाधीश म्हणून वर्णी लावण्यासाठी त्यांचे हे लांगुलचालन सुरु असते.- न्या. राकेश कुमार, न्यायाधीश, पाटणा हायकोर्ट

टॅग्स :Courtन्यायालय