शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘पठाणकोट’चा सूत्रधार पाकमधून झाला पसार

By admin | Updated: June 17, 2016 02:56 IST

पठाणकोट हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांना फोनवरून सूचना देणारा ‘जैश ए मोहंमद’चा नेता अफगाणिस्तानात पळाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात भारताचे सात लष्करी जवान शहीद झाले होते.

लाहोर : पठाणकोट हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांना फोनवरून सूचना देणारा ‘जैश ए मोहंमद’चा नेता अफगाणिस्तानात पळाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात भारताचे सात लष्करी जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट तळावर २ जानेवारी रोजी हल्ला केला होता. हल्ल्यादरम्यान त्यांना पाकिस्तानातून सूचना दिल्या जात होत्या. या सूचना देणारा म्होरक्या अफगाणिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे या हल्ल्याचा तपास करणाऱ्या संयुक्त चौकशी पथकातील एका सदस्याने गुरुवारी पीटीआयला सांगितले. हा नेता विशीतील असून, पठाणकोट हल्ल्यादरम्यान तो पाकच्या आदिवासी भागातून दहशतवाद्यांना विविध सूचना देत होता. हल्ल्यादरम्यान त्याने दहशतवाद्यांशी १८ वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. सुरक्षा यंत्रणांनी पाकच्या आदिवासी भागांत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, तो अफगाणिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे वृत्त आहे, असे या अधिकाऱ्याने जैशच्या त्या नेत्याचे नाव उघड न करता सांगितले. (वृत्तसंस्था)तपास संस्थांवर दबावपठाणकोट प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य हुडकून काढण्यासाठी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा तपास संस्थांवर प्रचंड दबाव आहे. पंजाब प्रांताच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने पठाणकोट हल्ल्याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे. एनआयएची पुन्हा विनंतीपठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यास राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाला पाकिस्तानचा दौरा करण्याची परवानगी मिळावी म्हणून पाकिस्तान सरकारशी संपर्क साधण्याची विनंती एनआयएने परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे.