शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘ताटातुटी’ नगरसेवकांच्या पथ्यावर

By admin | Updated: September 26, 2014 02:26 IST

शिवसेना-भाजपा युतीने घेतलेली फारकत आणि आघाडीतील बिघाडी मात्र इच्छुक उमेदवारांच्या पथ्यावर पडली आहे़

शेफाली परब-पंडित, मुंबईशिवसेना-भाजपा युतीने घेतलेली फारकत आणि आघाडीतील बिघाडी मात्र इच्छुक उमेदवारांच्या पथ्यावर पडली आहे़ स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले राजकीय पक्ष तगड्या उमेदवारांच्या शोधात आहेत़ तर अन्य राजकीय पक्षांचे पर्याय खुले झाल्यामुळे इच्छुकांना संधी चालून आल्या आहेत़ आतापर्यंत मनसे आणि काँग्रेसच्या पहिल्याच यादीतून पाच विद्यमान व दोन माजी नगरसेवकांना आमदारकीची तिकीटे मिळाली आहे़ त्यामुळे आणखी काही इच्छुक नगरसेवकांनाही यंदा लॉटरी लागण्याची शक्यता आहे़विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत़ मात्र ज्याचे पक्षात वजन जास्त त्यालाच ही लॉटरी लागत असल्याचे आतापर्यंतचे चित्र होते़ त्यामुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न प्रत्येक निवडणुकीत भंग होत होते़ परंतु या वेळेस शिवसेना-भाजपात फारकत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बिघाडी असल्यामुळे संधी जास्त आणि तगडे उमेदवार कमी असे चित्र निर्माण झाले आहे़ त्यामुळे मित्रपक्षातील नाराजांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत़ मागच्या पालिका निवडणुकीत तिकीट कापले गेल्यामुळे अन्य पक्षामध्ये उडी घेतलेल्या नगरसेवकांनाही लॉटरी लागली आहे़ पितृपक्षामुळे यादी जाहीर करणे लांबणीवर टाकणाऱ्या मोठ्या राजकीय पक्षांनी आज घटस्थापनेच्या दिवशीच पहिली यादी जाहीर केली़ मनसे आणि काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये विद्यमान नगरसेवकांसह अन्य पक्षातून आलेल्या इच्छुकांनाही तिकीट देऊन खूश करण्यात आले आहे़ यामुळे अन्य पक्षातील इच्छुकांच्या अपेक्षा आणि पर्यायही वाढले आहेत़ (प्रतिनिधी)