शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट मिळणार अकरा दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 05:25 IST

केंद्राची घोषणा; भ्रष्टाचारालाही आळा बसणार, देशात ३६ कार्यालये

नवी दिल्ली : आता अर्ज केल्यानंतर अकरा दिवसांत पासपोर्ट जारी केला जाईल. ही घोषणा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी लोकसभेत केली.यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासांत पुरवणी प्रश्न विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना व्ही. मुरलीधरन म्हणाले की, ‘तात्काळ’ योजनेद्वारे अर्ज केलेल्यांना मात्र पासपोर्ट खूपच कमी दिवसांत दिला जाईल.पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची पोलिसांकडून शहानिशा केली जाते. त्यासाठी एक अ‍ॅप्लिकेशन ७३१ पोलीस जिल्ह्यांमध्ये वापरण्यात येत आहे. त्याद्वारे अर्जदाराची कमी वेळेत तपासणी करणे अधिक सुलभ होणार आहे, तसेच त्यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल.पासपोर्टची प्रक्रिया आॅनलाईन झाली असली तरी तो मिळेपर्यंत काही टप्प्यांवर अजूनही भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारकडे करण्यात आल्या होत्या. कधीकधी पोलिसांकडून होणाºया तपासणीत दिरंगाई होते. अशा काही कारणांमुळे अर्ज केल्यापासून पासपोर्ट मिळण्यास वीस-पंचवीस दिवस लागत असल्याचीही उदाहरणे आहेत.खासगी कंपन्यांचा सहभाग नाहीपासपोर्ट मिळण्यासाठी लोकांना अनेक अडचणींचा सामना का करावा लागतो असा सवाल काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी विचारला होता.त्यावर व्ही. मुरलीधरन म्हणाले की, देशामध्ये ३६ पासपोर्ट कार्यालयांशिवाय ९३ पासपोर्ट सेवाकेंद्रे, ४१२ टपाल कार्यालयांतील पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत आहेत. आणखी एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, टपाल कार्यालयांतील पासपोर्ट सेवा केंद्रे खासगी कंपनीमार्फत चालविली जात नाहीत.