पिंपळगाव बसवंत : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात लाक्षणिक संपात सहभाग घेतला.महाराष्ट्र शासनाच्या कामगार कायद्यातील कामगार हितविरोधी बदलाच्या धोरणाच्या निषेधार्थ व कामगार हितविरोधी धोरण थांबविण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी व अन्य कामगारांनी सोमवारी एक दिवसांचा संप पुकारल्याने बाजार समितीचे काम ठप्प झाले होते.यावेळी माथाडी संचालक नारायण पोटे, दीपक दौंडकर, दीपक मोरे, आप्पा जाधव आदिंचे भाषणे झालीत व शासनाने जातक अटी रद्द करण्याची मागणी यावेळी नारायण पोटे यांनी केली. (वार्ताहर)--कॅप्शनमाथाडि कामगारांना मार्गदर्शन करतांना संचालक नारायण पोटे व संपात सहभागी माथाडी कामगार.----कॅप्शन पिंपळगाव बसवंत येथील भाऊनगर येथील अंगणवाडीत डोहाळे व ओटी भरण्याचा कार्यक्रम तसेच वाढदिवसाच्या कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी अंगणवाडी सेविका, सुनंदा खैरणार, रुक्साना, लता क्षिरसागर, उज्वला कागदे, लता शिरसागर, तायो मॅडम, खांडवे मॅडम.----
माथाडी कामगारांचा लाक्षणिक संपात सहभाग
By admin | Updated: March 21, 2015 00:16 IST