शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीयांना अंशत: दिलासा! 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्केच प्राप्तिकर

By admin | Updated: February 1, 2017 15:39 IST

केंद्र सरकारकडून मध्यम वर्गीयांना दिलासा देण्यात आला आहे. मध्यमवर्गीयांना करात सवलत देण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात  प्राप्तिकर भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामधून प्राप्तिकर भरणाऱ्यांना हातचे राखून दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातून टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही फेरबदल न करता जेटली यांनी  अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न  असलेल्या वर्गाकडून आता 10 ऐवजी 5 टक्केच प्राप्तिकर आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे प्राप्तिकराच्या चौकटीत मोठे फेरबदल होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. 
 
जेटली यांनी प्राप्तिकराच्या चौकटीत फेरबदल जाहीर केले नाहीत. मात्र अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणा-यांकडून आता 10 ऐवजी 5 टक्केच कर आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच  5 ते 10 लाख रुपये उत्पन्न गट व 10 लाख रुपयांवरील उत्पन्न असणा-या गटासाठीची कररचना जैसे थेच ठेवण्यात आली आहे.  ही कररचना आधीप्रमाणेच अनुक्रमे 20 व 30 टक्केच आकारण्यात आली आहे. त्याबरोबरच 50 लाख ते एक कोटी रुपये उत्पन्न असलेल्यांच्या उत्पन्नावर 10 टक्के सरचार्ज लावण्यात येणार आहे.  जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कॅम रिर्टन फाईल करणा-यांची चौकशी होणार नाही, असे अरुण जेटली यांनी सांगितले.