तरसोद येथे आगीत संसारोपयोगी वस्तू खाक
By admin | Updated: March 12, 2016 02:22 IST
नशिराबाद- तरसोद येथे एका घराला शुक्रवारी सकाळी आग लागली. त्यात जीवनावश्यक, गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावातील गजानननगरात अशोक मांगीलाल कुशवाह व त्यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. ते सकाळीच मजुरीसाठी निघाले. ते नसताना घराला आग लागली. शेजारच्यांच्या लक्षात ही बाब आली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. आगीदरम्यान घरातील सिलिंडर बाहेर ...
तरसोद येथे आगीत संसारोपयोगी वस्तू खाक
नशिराबाद- तरसोद येथे एका घराला शुक्रवारी सकाळी आग लागली. त्यात जीवनावश्यक, गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावातील गजानननगरात अशोक मांगीलाल कुशवाह व त्यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. ते सकाळीच मजुरीसाठी निघाले. ते नसताना घराला आग लागली. शेजारच्यांच्या लक्षात ही बाब आली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. आगीदरम्यान घरातील सिलिंडर बाहेर काढण्यात आले. शेजारील दोन घरांना आगीची झळ पोहोचली. आगीत धान्य, गृहोपयोगी वस्तू, रोकड, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी जळून खाक झाले. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाचे बंब गावात पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणली. घराचा पंचनामा करण्यात आला. (वार्ताहर)