शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पर्रीकर यांचे काँग्रेसला आव्हान

By admin | Updated: April 28, 2016 01:51 IST

संपुआ सरकारच्या कार्यकाळात अगुस्ता वेस्टलँड कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले होते,

नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या कार्यकाळात अगुस्ता वेस्टलँड कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले होते, या काँग्रेसच्या दाव्याला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आव्हान दिले आहे. इटलीच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करून सात-आठ दिवसानंतर प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले. माजी संरक्षणमंत्री व काँग्रेसचे नेते ए. के. अँथनी यांनी मात्र मनोहर पर्रीकर आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि मोदी सरकारला १0 प्रश्न विचारले.ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कंपनीला मेक इन इंडियामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि त्यासाठी त्या कंपनीला काळ्या यादीतून काढण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. स्वत:ची कृती जनतेसमोर येउ नये, यासाठीच काँग्रेसवर भाजपा नेते खोटे आरोप करीत असल्याची टीकाही अँथनी यांनी केली. या हेलिकॉप्टर सौद्याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि जे कोणी दोषी आढळतील, त्यांना खुशाल तुरुंगात टाकावे. >ते १० प्रश्न४बंदी घातलेल्या कंपनीवरील प्रतिबंध का उठवण्यात आला? सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाने या कंपनीविषयी प्रतिकुल मत व्यक्त केले असतानाही कंपनीला मेक इन इंडियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरलचे मत का मागवले? नौदलासाठी २0१५ साली अगुस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर्स का वापरण्यात आली? ही कंपनी आणि टाटा समूह यांच्या संयुक्त गुंतवणुकीला एफआयपीबीने २0१४ साली मंजुरी का दिली? आपली सीबीआयने चौकशी करावी, असा प्रस्ताव जेम्स खिस्तियनने केला, तेव्हा तो का अमान्य करण्यात आला? केरळमधील मच्छिमारांच्या मृत्यूस जबाबदार इटलीच्या खलाशांच्या सुटकेच्या बदल्यात काँग्रेस नेत्यांना अडकावण्याबाबत समझोता झाला, हे खरे आहे का? राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्ती रमणसिंग यांनी या कंपनीशी व्यवहार केल्याने झालेल्या नुकसानाबाबत कॅगने ठपका ठेवला असताना त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली? असे ते १० प्रश्न आहे.