जम्मू : संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या भागाचा दौरा केला आणि जम्मू-काश्मीरच्या राजौरी, पूंछ क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था तसेच घुसखोरी प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला.संरक्षण मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर आलेले पर्रीकर यांनी लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग, उत्तर कमानचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी.एस. हुड्डा आणि १६ कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल के.एच. सिंग यांच्यासमवेत हमीरपूर बटालियन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेलगतच्या आघाडीच्या क्षेत्राचा दौरा केला. या ठिकाणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना घुसखोरी प्रतिबंधक उपायांची माहिती दिली. संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पर्रीकर यांनी नियंत्रण रेषेवर जवानांशी चर्चा केली.
पर्रीकर यांनी केला सीमा क्षेत्राचा दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2015 23:52 IST